Team India : विश्वास ठेवला त्यानेच धोका दिला, T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचा हुकमी एक्का उघडा पडला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. टी-20 वर्ल्ड कपआधी झालेल्या या सीरिजमध्ये टीम इंडियाचं सगळ्यात घातक अस्त्र अपयशी ठरलं आहे.
advertisement
न्यूझीलंडने 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये दिग्गजांनी भरलेल्या टीम इंडियाला जबर धक्का दिला. सीरिजचा पहिला सामना गमावल्यानंतर किवी टीमने लागोपाठ 2 सामने जिंकले. भारतीय भूमीवर न्यूझीलंडला पहिल्यांदाच वनडे सीरिज जिंकता आली आहे. इंदूरमधल्या शेवटच्या वनडेमध्ये न्यूझीलंडचा 41 रननी विजय झाला, याचसोबत त्यांनी सीरिज 2-1 ने जिंकली.
advertisement
advertisement
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये बुमराहला विश्रांती देण्यात आली, त्यामुळे सगळ्यात अनुभवी असलेल्या कुलदीप यादववर सर्वाधिक जबाबदारी होती. पण 3 सामन्यांमध्ये कुलदीपला फक्त 3 विकेटच घेता आल्या, तसंच त्याने रनही बऱ्याच दिल्या. डॅरेल मिचेलने त्याच्या पहिल्याच बॉलवर सरळ सिक्स मारला आणि कुलदीपच्या आत्मविश्वासाला धक्का दिला, त्यानंतर कुलदीपने बचावात्मक बॉलिंग केली.
advertisement
advertisement
advertisement
टी-20 वर्ल्ड कप हा भारतात होणार आहे, जिथे स्पिन बॉलर महत्त्वाची भूमिका बजावतील. भारतीय टीममध्ये वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव हे दोनच स्पेशलिस्ट स्पिनर आहेत. तर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर आहेत, पण वॉशिंग्टन सुंदर वर्ल्ड कपपर्यंत फिट होणार का नाही? याबाबत सस्पेन्स कायम आहे.








