ChatGPT मध्ये 'GPT' या शब्दाचा फुल फॉर्म काय? याचा नेमका अर्थ अनेकांना माहितीच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बहुतेक लोकांना वाटतं की हे फक्त एक 'चॅटिंग' करण्याचं सॉफ्टवेअर आहे. पण खरं तर, 99% लोकांना यामागचं डोकं आणि 'जीपीटी'चा फुल फॉर्म माहिती नसतो. एआय (AI) च्या जगात क्रांती घडवून आणणाऱ्या या तीन शब्दांचा अर्थ काय आहे, हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
मुंबई : आजच्या काळात आपल्याला काहीही माहिती हवी असेल, तर आपण गुगलपेक्षा जास्त ChatGPT ला विचारतो. ऑफिसचं प्रेझेंटेशन असो, मुलांचा शाळेचा प्रोजेक्ट असो किंवा अगदी एखाद्याला पाठवायचं कवितेचं मेसेज असो; चॅटजीपीटीकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयार असतं. इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये हे नाव आता घर करून बसलंय. पण, दिवसभर ज्याला आपण प्रश्न विचारतो, त्या चॅटजीपीटीमधील 'GPT' या शब्दाचा नेमका अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
बहुतेक लोकांना वाटतं की हे फक्त एक 'चॅटिंग' करण्याचं सॉफ्टवेअर आहे. पण खरं तर, 99% लोकांना यामागचं डोकं आणि 'जीपीटी'चा फुल फॉर्म माहिती नसतो. एआय (AI) च्या जगात क्रांती घडवून आणणाऱ्या या तीन शब्दांचा अर्थ काय आहे, हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
काय आहे GPT चा फुल फॉर्म?
GPT म्हणजे Generative Pre-trained Transformer. ऐकायला हा शब्द थोडा तांत्रिक वाटला तरी, याच्या प्रत्येक अक्षरामध्ये या तंत्रज्ञानाची ताकद दडलेली आहे.
advertisement
1. Generative (जेनेरेटिव्ह) - नवीन निर्मिती करणारा
जीपीटीमधील 'जी' चा अर्थ होतो 'जेनेरेटिव्ह'. याचा अर्थ असा की, हे एआय केवळ गुगलसारखी माहिती शोधून तुमच्यासमोर ठेवत नाही, तर ते तुमच्या प्रश्नानुसार नवीन मजकूर तयार (Generate) करतं. म्हणूनच ते तुमच्यासाठी निबंध लिहू शकतं, कोडिंग करू शकतं आणि अगदी तुमच्याशी गप्पाही मारू शकतं. हे आधीच असलेल्या माहितीची नक्कल न करता, स्वतःहून नवीन उत्तर तयार करतं.
advertisement
2. Pre-trained (प्री-ट्रेंड) - आधीच शिकवलेला
'पी' चा अर्थ होतो 'प्री-ट्रेंड'. चॅटजीपीटी तुमच्या प्रश्नांची उत्तरं इतक्या प्रभावीपणे देऊ शकतं कारण त्याला आधीच जगातील अफाट माहितीवर प्रशिक्षण (Training) देण्यात आलं आहे. इंटरनेटवरील लाखो लेख, पुस्तकं आणि माहिती चॅटजीपीटीने आधीच वाचली आहे. यामुळेच त्याला भाषेची जाण आहे आणि तो माणसासारखा संवाद साधू शकतो.
advertisement
3. Transformer (ट्रान्सफॉर्मर) - संदर्भाचा बाप
जीपीटीचा सर्वात महत्त्वाचा आणि तांत्रिक भाग म्हणजे 'ट्रान्सफॉर्मर'. हे नाव ऐकलं की आपल्याला एखादा मुव्ही किंवा इलेक्ट्रिक डीपी आठवते, पण एआयमध्ये याचा अर्थ वेगळा आहे. ट्रान्सफॉर्मर हे एक असं तंत्रज्ञान आहे जे वाक्यातील शब्दांचा संदर्भ (Context) ओळखतं.
उदाहरणार्थ: "बँक" या शब्दाचा अर्थ नदीचा काठ आहे की पैशांची बँक, हे वाक्यावरून ओळखण्याचं काम हे ट्रान्सफॉर्मर मॉडेल करतं. याच तंत्रज्ञानामुळे चॅटजीपीटी अत्यंत हुशार आणि लॉजिकल उत्तरं देऊ शकतं.
advertisement
लोक कुठे चुकतात?
अनेकांना वाटतं की चॅटजीपीटी माणसासारखा विचार करतो, पण तसं नाही. तो फक्त त्याच्याकडे असलेल्या डेटाच्या आधारावर पॅटर्न (Patterns) ओळखतो आणि पुढचा शब्द कोणता असेल याचा अंदाज लावतो. तांत्रिक भाषेत हे एक अत्यंत प्रगत 'लँग्वेज मॉडेल' आहे, केवळ चॅटिंग टूल नाही.
'जीपीटी'चा अर्थ समजून घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे तंत्रज्ञान किती प्रगत आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चॅटजीपीटी वापरताल, तेव्हा तुम्हाला माहित असेल की तुम्ही एका 'जेनेरेटिव्ह प्री-ट्रेंड ट्रान्सफॉर्मर'शी बोलत आहात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 10:23 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
ChatGPT मध्ये 'GPT' या शब्दाचा फुल फॉर्म काय? याचा नेमका अर्थ अनेकांना माहितीच नाही








