Success Story: पेशव्यांच्या काळातील सुगंध आजही ताजा; पुण्यात 153 वर्षांची परंपरा जपणारी पेढी

Last Updated:

रविवार पेठेतील दामोदरदास भगवानदास सुगंधी पेढी तब्बल 153 वर्षांपासून ही पेढी पुण्याचा सुगंध जपत असून, पेशव्यांच्या काळात सुरू झालेली ही परंपरा आज सातव्या पिढीकडून अभिमानाने पुढे नेली जात आहे.

+
व्यवसाय 

व्यवसाय 

पुणे: पुणे शहराची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पारंपरिक ओळख जपणारी अनेक ठिकाणे आजही शहराच्या विविध भागांत पाहायला मिळतात. त्यातीलच एक महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण नाव म्हणजे रविवार पेठेतील दामोदरदास भगवानदास सुगंधी पेढी. तब्बल 153 वर्षांपासून ही पेढी पुण्याचा सुगंध जपत असून, पेशव्यांच्या काळात सुरू झालेली ही परंपरा आज सातव्या पिढीकडून अभिमानाने पुढे नेली जात आहे.
1872 मध्ये स्थापन झालेल्या या सुगंधी पेढीने अगरबत्ती, धूप आणि अत्तर या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीपासूनच मसाला धूप आणि अगरबत्ती हे या व्यवसायाचे वैशिष्ट्य राहिले आहे. नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या अगरबत्त्या आणि अत्तरांमुळे या पेढीची गुणवत्ता आजही तितकीच टिकून आहे. बदलत्या काळानुसार बाजारपेठ बदलली असली, तरी पारंपरिक पद्धती, जुने फॉर्म्युले आणि सुगंध जपण्यावर येथे आजही भर दिला जातो.
advertisement
या पेढीत आजही कस्तुरी, अंबरसह जुन्या पारंपरिक सहा प्रकारच्या अगरबत्त्या उपलब्ध आहेत. तसेच पानडी अगरबत्ती हा येथील आणखी एक वेगळा प्रकार मानला जातो. अत्तरांमध्ये हिना, केवडा, मोगरा, जुई, सोनचाफा, सोन टक्का, सुरण, दवना तसेच पेशवाई अत्तर यांसारख्या पारंपरिक आणि दुर्मिळ सुगंधांचा समावेश आहे. एकेकाळी 1915 साली अगरबत्तीची किंमत अवघी एक आना ते दीड आना होती. आज किंमती वाढल्या असल्या, तरी ग्राहकांची मागणी मात्र तितकीच आहे.
advertisement
सध्या साधारण एक किलो अगरबत्तीचा दर एक हजार रुपयांपासून पुढे आहे. अगरबत्तीमध्ये एकूण 24 प्रकार उपलब्ध असून, अत्तरांमध्ये तब्बल 500 पेक्षा अधिक व्हरायटी आहेत. विशेष म्हणजे या सुगंधी उत्पादनांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर परदेशातही मोठी मागणी आहे. परंपरा, गुणवत्ता आणि विश्वास यांचा संगम साधणारी ही पेढी आजही जुन्या पुण्याच्या ओळखीचा एक सुगंधी भाग ठरत आहे, अशी माहिती देवेंद्र सुगंधी यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Success Story: पेशव्यांच्या काळातील सुगंध आजही ताजा; पुण्यात 153 वर्षांची परंपरा जपणारी पेढी
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement