हॉटेलचं Free WiFi वापरता? मग ही एक चूक तुम्हाला भारी पडू शकते, सत्य ऐकून धक्का बसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हॉटेलच्या ज्या वायफायमुळे तुमची कामं सोपी होतात, त्याच वायफायच्या जाळ्यात सायबर गुन्हेगार टपून बसलेले असतात. मोफत वायफाय वापरणं महागात कसं पडू शकतं आणि स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं, हे प्रत्येक प्रवाशाने जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
लांबच्या प्रवासावरून आल्यावर किंवा कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेल्यावर, हॉटेलच्या रूममध्ये शिरल्या शिरल्या आपण पहिली गोष्ट काय करतो? अंगावरची बॅग सोडून आपण बेडवर जातो आणि लगेच मोबाईलचं वायफाय (WiFi) टाकून फोन स्कोल करतो. हॉटेलचं 'फ्री वायफाय' कनेक्ट झालं की जणू आपल्याला जगाचं सुख मिळाल्याचा आनंद होतो. पण, हाच मोफत मिळणारा इंटरनेटचा आनंद तुमच्या बँक बॅलन्ससाठी आणि खाजगी आयुष्यासाठी मोठा धोका ठरू शकतो, याची तुम्हाला कल्पना आहे का?
advertisement
advertisement
हॉटेलचं वायफाय असुरक्षित का असतं?हॉटेलमध्ये एकाच वेळी शेकडो पाहुणे एकाच नेटवर्कला कनेक्टेड असतात. हॉटेलचे हे नेटवर्क सहसा जुन्या तंत्रज्ञानावर आधारित असतात किंवा त्यांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कमकुवत असते. सायबर तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक नेटवर्क हे हॅकर्ससाठी सर्वात सोपं सावज असतं. 'रेडिट'च्या एका रिपोर्टनुसार, अशा नेटवर्कशी कनेक्ट होताच तुमचा वैयक्तिक डेटा, लॉगिन आयडी आणि पासवर्ड धोक्यात येऊ शकतात.
advertisement
advertisement
advertisement
"पासवर्ड आहे म्हणजे सुरक्षित" हा तुमचा गैरसमजअनेकदा आपल्याला वाटतं की हॉटेलने वायफायचा पासवर्ड दिला आहे, म्हणजे ते सुरक्षित आहे. पण सत्य वेगळं आहे. जरी वायफाय पासवर्ड प्रोटेक्टेड असलं, तरी एकाच नेटवर्कवर अनेक अनोळखी लोक असतात. प्रगत सुरक्षा यंत्रणा नसेल, तर हॅकर्स अत्यंत सहजपणे तुमच्या डिव्हाइसमध्ये डोकावू शकतात.
advertisement
प्रवासात सुरक्षित राहण्यासाठी 'या' 4 टिप्स फॉलो करातुम्ही हॉटेलमध्ये उतरला असाल, तर इंटरनेट वापरताना खालील काळजी नक्की घ्या:1. बँकिंग व्यवहार टाळा: हॉटेलच्या वायफायवर कधीही पैसे ट्रान्सफर करू नका किंवा गुगल पे/फोन पे सारखे व्यवहार करू नका.2. VPN चा वापर करा: व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) वापरल्यामुळे तुमचा डेटा एन्क्रिप्ट होतो, ज्यामुळे हॅकर्सना तुमची माहिती वाचता येत नाही.3. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन: तुमच्या सोशल मीडिया आणि बँक खात्यांना 'टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन' (2FA) सुरू ठेवा, जेणेकरून पासवर्ड कळला तरी कोणी लॉगिन करू शकणार नाही.4. मोबाईल हॉटस्पॉट: शक्य असल्यास हॉटेलच्या वायफायऐवजी घरातील कोणत्या दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलचा 'हॉटस्पॉट' वापरा. हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.
advertisement










