वडिलांनी पाइपानं मारलं, शरीर काळनिळ पडलं; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची Love Story सैराटपेक्षा कमी नाही
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Actress Love Story : प्रसिद्ध मराठी टेलिव्हिजन अभिनेत्रीची लव्ह स्टोरी सैराटपेक्षा कमी नाहीये. आजही तिच्या आई-वडिलांनी तिला स्वीकारलेलं नाही. नेमकं काय घडलं होतं?
advertisement
advertisement
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री कोमल कुंभार हिच्याविषयी आपण बोलतो. कोमलने काही महिन्यांआधीच लग्न केलं. पण हे कोमलचं गोकुळसोबतच दुसरं लग्न होतं. त्यांनी कुटुंबाच्या भीतीनं 2019 मध्येच कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर काय घडलं हे कोमल आणि गोकुळ यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
advertisement
कोमल आणि गोकुळची लव्ह स्टोरी ही सैराटपेक्षा कमी नाहीये. लग्नापर्यंत पोहोचण्यासाठी तिला घरच्यांचा तीव्र विरोध, मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागला. कॉलेजमध्ये असताना एकांकिकेच्या निमित्तानं कोमल आणि गोकुळ नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले. जातीमुळे घरचे विरोध करणार या भीतीने कोणालाही न सांगता त्यांनी लग्न रजिस्टर केलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









