पावसात कपडे सुकवण्यासाठी तुम्ही काय काय करत नसाल. पण एका गृहिणीने फक्त 2 बांगड्यांत कपडे सुकवण्याची ट्रिक दाखवली आहे. बांगड्या ज्या महिला हातात घालतात. आता त्यात कपडे कसे सुकवायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला पाहूयात नेमकं काय करायचं.
Kitchen Jugaad Video : पावसाळ्यात दररोज संध्याकाळी लिंबाचा एक दिवा लावा, दिसेल 'चमत्कार'
advertisement
गृहिणीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे समान आकाराचे 2 पाइप घ्यायचे. त्याला काही अंतर सोडून छिद्र पाडायचे. त्या छिद्रातून दोरी टाकायची. पाइपच्या दोन्ही बाजूला दोरी बांधून त्यात दोन्ही बाजूने बांगड्या बांधायच्या.
हा कपडे वाळवण्याचा स्टँड तयार झाला. त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बांगड्यांच्या मदतीने तुम्ही हा स्टँड कुठेही लटकवू शकता.
Avika Rawat Foods वर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. स्टँड नेमका कसा तयार करायचा याची संपूर्ण कृती तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळेल.
Kitchen Jugaad Video : दरवाजा, खिडकीवर पाण्याची पिशवी लटकवत आहेत लोक, चमत्कारिक फायद
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काही संबंध नाही.)