घरगुती ड्रिंक बनवण्यासाठी सामग्री :
एक ते दोन चमचे जिरा पावडर
एक तुकडा दालचिनी
एक इंच आल्याचा तुकडा
एक ग्लास पाणी
कृती : एक ग्लास ड्रिंक बनवण्यापूर्वी तुम्ही सर्वात आधी एका भांड्यात पाणी घेऊन ते गरम करा. मग पाण्यात अर्धा चमचा जिरा पावडर, एक दालचिनीचा तुकडा, एक आल्याचा तुकडा इत्यादी टाकून 5 ते 7 मिनिटांसाठी उकळवा. मग पाणी गाळून एका ग्लासमध्ये काढा आणि मग थोडे थंड झाले की त्याचे सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास चवीसाठी तुम्ही या ड्रिंकमध्ये गूळ सुद्धा टाकू शकता.
advertisement
Pregnancy Tips : गर्भातील बाळाला अनेक त्रासापासून वाचवते फीटल मेडिसिन; तज्ज्ञांनी दिली माहिती
या घरगुती ड्रिंकने कसा मिळतो फायदा :
दालचिनीमध्ये फायबर अँटीऑक्सिडंटचे गुण असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते. दालचिनीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे गुड बॅक्टेरियाचा विकास होतो आणि पचनक्रियेशी निगडित समस्या दूर होतात.
जिरं देखील पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. जिरमध्ये भरपूर फायबर असते जे पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी मदत करते. याच्या सेवनाने गॅस ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात. आल्याच्या सेवनाने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल मसल्सला आराम मिळतो. आल्यात आढळणाऱ्या गुणधर्मांमुळे गॅस, ऍसिडिटी, ब्लॉटिंग सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
गॅस, ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही या घरगुती ड्रिंकचे सेवन करू शकता. पण जर तुमची ऍसिडिटी, गॅसची समस्या वाढत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
(सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकुरावर आधारित आहे. त्यामुळे आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)