बागपत : व्यसन हे अत्यंत वाईट असतं. त्यामुळे आपल्या शरिराचं नुकसान होतंचं शिवाय आपल्या प्रियजनांनाही त्रास होतो. 2022च्या एका अहवालानुसार, देशात 10 ते 17 वर्ष वयोगटातील 1.58 कोटी मुलं नशेच्या पदार्थांच्या आहारी गेले आहेत. हा आकडा प्रचंड गंभीर आहे.
अनेकजणांना वेगवेगळे उपाय करूनही व्यसनमुक्त होता येत नाही. कारण उपायांपेक्षा त्यांचा स्वतःच्या मनावर ताबा असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. परंतु ते नसेल तर आपण हा रामबाण उपाय नक्कीच करू शकता. तुमच्या प्रियजनांना व्यसनमुक्त करायचं असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता.
advertisement
कितीही घासले दात, तरी तोंडाचा येतो वास? ही तर श्वासांची दुर्गंधी! 'अशी' करा झटक्यात दूर
औषधी गुणांचा खजिना
काकडीमुळे सौंदर्य खुलतं, डोळ्यांना आराम मिळतो. तसंच शरीर ऊर्जावान राहतं. काकडीच्या अँटीऑक्सिडंट गुणांसह खनिजं, पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे त्वचा आणि केसांचा पोत सुधारतो. शिवाय बद्धकोष्ठता दूर होते, वजन कमी होतं आणि मानसिक तणावापासूनही मुक्ती मिळते.
'त्या' दिवसांत खूप त्रास होतो, खाडा करावा लागतो? मग 'या' चहाची सवय लावूनच घ्या!
शरिरातली घाण होते साफ
डॉ. राघवेंद्र चौधरी सांगतात की, काकडीच्या बियांमध्ये सल्फर मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे व्यसन कोणतंही असलं तरी त्याची सवय हळूहळू कमी होते. व्यसनमुक्तीसाठी हा रामबाण उपाय आहे. यात अँटीऑक्सिडंटही भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे पोट साफ होतं आणि चेहरा फ्रेश दिसतो. शिवाय काकडीमुळे भूकही कमी लागते, परिणामी अर्थातच वजन कमी होतं. तसंच काकडीत पाण्याचं प्रमाण भरपूर असतं.
असा करा वापर
डॉ. राघवेंद्र चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडीच्या बियांचा वापर लाडूतून करावा. सर्वात सोपा वापर म्हणजे आपण पाण्यात या बिया घालून पिऊ शकता. रात्री भिजवून सकाळी काळ्या मीठासोबत खाऊ शकता. ज्यामुळे पोटही साफ होतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा