TRENDING:

Shevaga Ladu : शेवग्याची पानं, शेंगांची भाजी तर नेहमीच खाता; आता एकदा शेवग्याचा लाडू बनवून पाहा

Last Updated:

Shevaga Laadu Recipe Video : तुम्ही मेथीचे लाडू खाल्ले आहेत. पण यात मेथीची भाजी नाही तर मसाल्यातील मेथीचा वापर होतो. त्यामुळे शेवग्याचा लाडू हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. शेवगा ही भाजी मग त्याचा लाडू कसा काय बनवणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लाडू म्हटलं की बुंदीचा लाडू, बेसनचा लाडू, रव्याचा लाडू, डिंकाचा लाडू, चुरमुऱ्यांचा लाडू, शेवाचा लाडू, ड्रायफ्रुटचा लाडू असे लाडू तुमच्यासमोर येतील. तसं मेथीचाही लाडू बनवला जातो. पण यात मेथीची भाजी नाही तर मसाल्यातील मेथीचा वापर होतो. त्यामुळे शेवग्याचा लाडू हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. शेवगा ही भाजी मग त्याचा लाडू कसा काय बनवणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण शेवग्याच्या लाडूच्या व्हिडीओची रेसिपी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
News18
News18
advertisement

शेवगा ही सुपरफूड म्हणून ओळखली जाते. ही पौष्टिक आणि औषधी भाजी आहे. शेवग्याची पानं, शेंग पाने, फुलं यांची भाजी केली जाते. शेवग्याची शेंग उसळ, आमडी, भाजी, सांबारमध्ये वापरतात, याचं सूपही बनवतात. शेवग्याच्या पानांची पालेभाजी करतात, शेवग्याच्या फुलांचीही भाजी केली जाते. एकंदर काय तर शेवगा एक भाजी आणि त्याची भाजी तुम्ही आजवर खातच आला आहात. पण आता तुम्हाला आम्ही शेवग्याचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहोत.

advertisement

Orange Recipe Video : संत्रीच नाही तर संत्र्याच्या सालीपासूनही बनते भन्नाट रेसिपी, संत्रा बर्फीइतकीच भारी

शेवग्याचे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी लागेल ती म्हणजे शेवग्याची पावडर, जी शेवग्याची पानं सुकवून बनवली जाते. तुम्हाला ही बाजारात किंवा ऑनलाईन वेबसाईट्सवरही मिळेल. गॅसवर कढई ठेवून त्यात शेवग्याची पावडर आणि बेसन थोडं तूप टाकून एकत्र करून छान भाजून घ्या. एका ताटात काढा. काजू-बदाम थोडे तुपात परतून घ्या. सुकं खोबरं, काळे तीळ, हलीम एकएक करून पॅनवर थोडं परतून घ्या. खजूर आणि मणुकाही एकत्र परतून घ्या. थोड्या पाण्यात गूळ, वेलची पूड, तूप टाकून उकळी काढून गूळाचं पाणी करून घ्या.

advertisement

आता भाजलेले काजू बदाम, सुकं खोबरं, काळे तीळ, हलीम सगळं बेसन आणि शेवग्याचा पावडरीच्या भाजलेल्या  मिश्रणात एकत्र करून गूळाच्या पाण्यात टाका. यातच खजूर आणि मणुकाही अॅड करा. मिश्रण चांगलं एकत्र करून घ्या.

Pohe Recipe Video : दररोज कांदेपोहे खाऊन कंटाळलात, आता पोह्यांवर बेसन टाकून पाहा

आता मिश्रण दुसऱ्या भांड्यात काढा. त्याच्यात गुठळ्या असतील तर हातांनी त्या कुस्करून घ्या आणि लाडू वळून घ्या. खायला तयार शेवग्याचे लाडू.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पाणी पिण्याकडे करताय दुर्लक्ष, वेळीच व्हा सावध, नाहीतर होतील हे गंभीर आजार Video
सर्व पहा

हिवाळा म्हणजे मेथी, डिंक, तीळ असे लाडू खाल्ले जातात. त्याऐवजी तुम्ही आता शेवग्याचे लाडूही ट्राय करू शकता. एकदा बनवून पाहा आणि कसे झाले आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. aamhi_malvani_15 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Shevaga Ladu : शेवग्याची पानं, शेंगांची भाजी तर नेहमीच खाता; आता एकदा शेवग्याचा लाडू बनवून पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल