Orange Recipe Video : संत्रीच नाही तर संत्र्याच्या सालीपासूनही बनते भन्नाट रेसिपी, संत्रा बर्फीइतकीच भारी

Last Updated:

Orange Peel Recipe Video : संत्र्याच्या सालीचा तसा वापर केला जातो हे तुम्हाला माहिती आहे. संत्र्याची साल सुकवून त्याची पावडर बनवून काही जण दात घासण्यासाठी किंवा सौंदर्यात त्याचा वापर करतात. पण संत्र्याच्या सालीपासून पदार्थही बनवता येतो, याचा कुणी विचारही केला नसेल.

News18
News18
संत्र्यापासून बनवला जाणारा पदार्थ कोणता? असं विचारलं तर बहुतेकांच्या तोंडावर संत्रा बर्फी हेच नाव चटकन येईल. पण तुम्हाला माहिती आहे का? संत्रीच नाही तर संत्र्याच्या सालीपासूनही पदार्थ बनतो. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे संत्र्याची साल फेकू नका, तर यापासून ही भन्नाट रेसिपी एकदा बनवून पाहा.
संत्र्याच्या सालीचा तसा वापर केला जातो हे तुम्हाला माहिती आहे. संत्र्याची साल सुकवून त्याची पावडर बनवून काही जण दात घासण्यासाठी किंवा सौंदर्यात त्याचा वापर करतात. पण संत्र्याच्या सालीपासून पदार्थही बनवता येतो, याचा कुणी विचारही केला नसेल. नेमका हा पदार्थ काय आहे त्याची संपूर्ण कृती आता आपण पाहुयात.
advertisement
संत्र्याची साल स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. एका कढईत फोडणीला टाकतो तितकं तेल गरम करा. त्यात चिरलेल्या संत्र्याच्या साली टाकून 5-7 मिनिटं परतून घ्या. जेणेकरून तेल आत जाईल. 5 मिनिटांनंतर याचा खूप छान सुगंध येईल. आता हे काढून घ्या.
त्याच कढईत फोडणीइतकंच तेल गरम करा. त्यात एक टेबलस्पून चणा डाळ, एक टेबलस्पून उडीद डाळ, एक टीस्पून मेथी, एक टेबलस्पून धने, आता बेडगी मिरची, कढीपत्ता, एक वाटी खोबरं   असं लागोपाठ टाकून एकएक करून परतून घ्या.
advertisement
आता गॅसवर एक पातेलं ठेवा त्यात तांब्याभर पाणी घ्या. यात थोडी मिरची, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता कुस्करून टाका. उकळी आली की यात संत्र्याच्या तेलात परतलेल्या साली टाका. थोड्याशा संत्र्याच्या साली बाजूला काढून ठेवा.  आता वर जे भाजलेलं जिन्नस होतं, त्यात या बाजूला काढलेल्या संत्र्याच्या साली टाकून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्या.
advertisement
आता संत्र्याच्या साली ज्या भांड्यात टाकल्यात त्याला उकळी आली असेल तर त्यात एक वाटी चिंचेचा कोळ आणि तुम्हाला जितकं गोड आवडतं त्यानुसार गूळ टाका. गूळ पूर्ण वितळलं की यात तयार केलेली संत्र्याची साल आणि मसाल्याची पेस्ट टाका. थोडं किंचित पाणी टाका मीठ टाकून चांगली उकळी येऊ द्या. जितकं हे उकळे तितकी त्याची चव चांगली लागेल. शेवटी तुम्ही यात हवं तर खोबरेल ते टाकू शकता. ही संत्र्याच्या सालीची मुडूली एक साऊथ इंडियन डिश आहे. करीचा हा एक प्रकार आहे.
advertisement
Mrs Bhagavath युट्युब चॅनेलवर याचा रेसिपी व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तुम्ही एकदा करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Orange Recipe Video : संत्रीच नाही तर संत्र्याच्या सालीपासूनही बनते भन्नाट रेसिपी, संत्रा बर्फीइतकीच भारी
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement