वर्धा : पनीर म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर पनीर टिक्का मसाला खाणे अनेकांना आवडतं. मात्र, हाच पनीर टिक्का करी मसाला घरीच तयार झाला तर? पनीर टिक्का करी मसाला ही रेसिपी घरीच कशी बनवावी? याचीच माहिती वर्ध्यातील गृहिणी श्रद्धा जगताप यांनी सांगितली आहे.
पनीर टिक्का करी मसाला बनवण्यासाठी साहित्य
advertisement
बारीक काप केलेले पनीर अर्धा किलो, कांद्याची प्युरी, टोमॅटोची प्युरी (टोमॅटोच्या आतला भाग काढून घ्या जेणेकरून भाजी आंबट होणार नाही) आलं लसूण पेस्ट, तुपात भाजलेले काजू, तुपात भाजलेले मगज बी, 2 टिस्पून भाजलेलं बेसन आणि तीळ, 1 वाटी दूध त्यात टिक्का मसाला मिक्स करून घ्या. अर्धी वाटी साजूक तूप, खडा मसाला, चवीनुसार तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर हे साहित्य लागेल.
बीबीक्यू, तंदूर अन् जैन वडापाव, कोल्हापुरात 40 वर्षांपासून फेमस आहे हे ठिकाण, Video
पनीर टिक्का करी मसाला बनवण्याची कृती
सर्वप्रथम भाजलेले मगज बी, भाजलेले काजू, तीळ आणि भाजलेले बेसन मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायची आहे. आता पनीरच्या तुकड्यांवर टिक्का मसाला आणि थोडे आपण घेतलेले थोडे थोडे मसाले घालून मिक्स करून ठेवायचे आहे. आता एका कढईमध्ये साजूक तूप घालून त्यात सगळे पनीरचे काप शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे साईडला ठेवून दुसरी कढई घेऊन त्यात तेल घालून खडा मसाला अॅड करायचा आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट अॅड करून चांगली शिजू द्या. कांद्याची प्युरी अॅड करून चांगली लालसर शिजू द्या.
बर्फ टाकून चहा कधी पिलात काय? पाहा कडक उन्हात थंडावा देणारी आईस टी रेसिपी, Video
आता टोमॅटो प्युरी अॅड करून चांगली शिजू द्या. आता त्यात दूध आणि मसाला अॅड केलेलं मिश्रण अॅड करा. थोडं पाणी घालू शकता. आता आपण घेतलेले सगळे मसाले या ठिकाणी अॅड करायचे आहेत. मसाला शिजल्यानंतर आपण काजू, मगज बी, बेसन आणि तिळाची बारीक केलेली पावडर अॅड करायची आहे. ऑलरेडी सगळं भाजून घेतलं आहे त्यामुळे या ठिकाणी जास्त भाजायची गरज नाही थोडं भाजल्यानंतर त्यात 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. आता हे ग्रेव्ही उकळी येईपर्यंत झाकून ठेवा उकळी आल्यानंतर आपण तुपात भाजून ठेवलेले पनीरचे तुकडे अॅड करा. छान एकत्र करून घ्या आणि कोथिंबीरने सजावट करून गरमागरम पनीर टिक्का करी मसाला सर्व्ह करा.