TRENDING:

Manifestation : मॅनिफेस्टेशन खरंच सत्यात उतरतं का ? मॅनिफेस्टेशन कसं करायचं ? शिवानी दीदींनी सांगितलेली पद्धत वापरुन पाहा

Last Updated:

प्रत्येकाला आयुष्यात आनंद, शांती, चांगलं आरोग्य आणि यश हवं असते. परंतु कधीकधी, आपल्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नाहीत. मॅनिफेस्टेशन ही एक प्रक्रिया आहे, ज्यात एखादी व्यक्ती त्यांचे विचार, भावना आणि श्रद्धा केंद्रित करून त्यांच्या इच्छा आणि ध्येयांना वास्तवात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत असते. Law of attraction प्रमाणे हे काम करतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : "इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है कि हर ज़र्रे ने मुझे तुमसे मिलाने की साज़िश की है" हा शाहरुखचा डायलॉग प्रसिद्ध आहे. तुम्हाला पण शाहरुखसारखी खऱ्या आयुष्यातली आणि सिनेमासारखी स्वप्नं पूर्ण करायची आहेत ? मग मॅनिफेस्ट करा.
News18
News18
advertisement

सोशल मीडियावर सध्या ट्रेंड आहे मॅनिफेस्टेशनचा. मनातली इच्छा सत्यात येण्याच्या दृष्टीनं केले जाणारे प्रयत्न. यासाठीचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या मनातली इच्छा, स्वप्न पूर्ण होणं अगदीच सोपं नसतं. पण त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.

प्रत्येकाला आयुष्यात आनंद, शांती, चांगलं आरोग्य आणि यश हवं असते. परंतु कधीकधी, आपल्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नाहीत. मॅनिफेस्टेशन ही एक प्रक्रिया आहे, ज्यात एखादी व्यक्ती त्यांचे विचार, भावना आणि श्रद्धा केंद्रित करून त्यांच्या इच्छा आणि ध्येयांना वास्तवात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत असते. Law of attraction प्रमाणे हे काम करतं.

advertisement

Sesame Seeds : छोट्या तीळांची मोठी जादू, वाचा तीळ खाण्याचे जबरदस्त फायदे

मॅनिफेस्टेशन करायचं म्हणजे कसं करायचं याबाबत, बहुतेक जण गोंधळलेले आहेत. याबाबत, ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. दररोज फक्त दोन मिनिटं योग्यरित्या मॅनिफेस्टेशन केलं तर तीस दिवसांत तुमच्या जीवनात फरक दिसून येईल असं त्यांनी या व्हिडिओमधे म्हटलंय.

advertisement

संकल्प केल्यानं सिद्धी मिळते हे आपण ऐकलंय. याचा अर्थ असा की आपण जे काही विचार करतो, वारंवार बोलतो आणि अनुभवतो ते आपल्या जीवनात सत्यात उतरु शकतं. आपण सतत 'मला हवं आहे' किंवा 'माझ्यात कमतरता आहे' असे शब्द वापरत राहिलो तर गोष्टी त्यानुसारच घडतात.

संकल्पांची भाषा नेहमीच सकारात्मक आणि वर्तमानकाळात असावी. उदाहरणार्थ, "मला आनंद हवा आहे" असं म्हणण्याऐवजी "मी नेहमीच आनंदी आहे" असं म्हणा असं त्यांनी सांगितलंय.

advertisement

"मला हवं आहे" असं म्हटल्यानं गरज कायम राहते, तर "मी आहे" असं म्हटल्यानं मनाला ते खरं असल्याचं मानण्यास भाग पाडते. सकाळी उठल्यावर सर्वात आधी तुमचा मोबाईल फोन तपासण्याऐवजी, तुमच्या मनाला एक दिशा द्या. दररोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी दोन मिनिटं हा संकल्प पुन्हा करा, असंही त्यांनी सांगितलंय.

मी नेहमीच आनंदी असते. मी शांत, संयमी आणि निर्भय आहे. मला आत्मविश्वास आहे. माझं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त आहे. माझं मन शांत आणि मजबूत आहे. माझं जीवन परिपूर्ण आहे आणि नेहमीच राहील असे विचार बोलणं कठीण वाटत असेल तर ते डायरीत लिहून ठेवा. दररोज आठ-दहा मुद्दे लिहिण्यासाठी फक्त दोन मिनिटं लागतात.

advertisement

Immunity : हिवाळ्यात आजारांना ठेवा लांब, खास लहानग्यांसाठी इम्युनिटी बुस्टर्स

नकारात्मक शब्द टाळणं का महत्त्वाचं ?

"माझ्याकडे वेळ नाही," "मी आजारी आहे," किंवा "माझ्या आयुष्यात समस्या आहेत" असे शब्द पुन्हा पुन्हा उच्चारल्याने तीच ऊर्जा वाढते. तुम्हाला काही समस्या असेल तर फक्त तुमच्या डॉक्टरांशी किंवा उपाय सांगू शकणाऱ्या व्यक्तीशी बोला, संपूर्ण जगाशी नाही.

तीस दिवसांत परिणाम दिसूल ?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अस्सल घरगुती जेवण, फक्त 30 रुपयात, पुण्यात हे आहे लोकेशन
सर्व पहा

दररोज योग्य शब्दात संकल्प पुन्हा करता तेव्हा तुमच्या मनाची भाषा बदलू लागते. हळूहळू, तीच भाषा तुमची सवय बनते आणि तीच ऊर्जा तुमच्या जीवनातील परिस्थिती बदलू लागते. शिवानी दीदींच्या मते, मॅनिफेस्टेशन ही जादू नाही, तर विचारांना आणि शब्दांना योग्य दिशा देणं आहे. दिवसातून फक्त दोन मिनिटं तुमच्या विचारांना योग्य दिशा दिली तर तीस दिवसांत आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू लागतील असंही त्यांनी या व्हिडिओत म्हटलंय.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Manifestation : मॅनिफेस्टेशन खरंच सत्यात उतरतं का ? मॅनिफेस्टेशन कसं करायचं ? शिवानी दीदींनी सांगितलेली पद्धत वापरुन पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल