असं तयार करा तुरटीचं खत
पावसाळ्यात तुरटीचा खत म्हणून वापर करता येतो. यासाठी सुमारे 20 ग्रॅम तुरटीचा छोटा तुकडा घ्या आणि एका ग्लास पाण्यात घाला. जेव्हा ऊन पडेल, तेव्हा रोपाच्या बाजूची माती थोडी उकरून एक दिवस तशीच ठेवा. जेणेकरून रोपाला थोडी हवाही मिळेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुरटीचं पाणी रोपाला घाला. महिन्यातून किंवा दीड महिन्यातून एकदा ही पद्धत तुम्ही वापरू शकता.
advertisement
या वनस्पतींसाठी वापरू शकता तुरटी
तुरटी खूप आंबट असते. म्हणून ज्या रोपांना सायट्रिक अॅसिडची गरज असते, त्या रोपांना तुरटीचं खत घालावं. याशिवाय फुलांच्या रोपांना तुरटी घातल्यानं ती निरोगी राहतात. तसंच फुलेही अधिक बहरतात. परंतु तुरटीच्या जास्त वापरामुळे पानं जळू शकतात.
शरीरावर टॅटू बनवण्याची आवड ठरू शकते जीवघेणी! 'या' गंभीर आजाराचा वाढू शकतो धोका
मुंग्या आणि कीटकांपासून झाडांचं होतं संरक्षण
वनस्पतींवर मुंग्या किंवा किडे असल्यास तुम्ही तुरटी खताचा वापर करू शकता. यासाठी कुंडीखाली तुरटी ठेवा किंवा कुंडीच्या मातीत मिसळा. ती कीटकनाशक म्हणून काम करील व झाडं वाढण्यास मदत होईल.
कीटकनाशक म्हणून उपयुक्त
तुरटीचा वापर कीटकनाशक म्हणून होतो. झाडावर किड्यांचा प्रादुर्भाव झाला असेल, तर तुरटी पाण्यात मिसळून ते पाणी झाडांवर घाला. त्यामुळे वाळवीसारखे काही प्रकारचे किडे मरू शकतात. कुंडीत तुरटी घालूनही झाडांना कीटकापासून वाचवता येतं.
मातीची प्रत वाढते
तुम्ही झाड लावण्यासाठी जी माती वापरली आहे, तिची प्रत तुरटीच्या साह्याने वाढते. यामुळे झाडाची वाढ सुधारेल. तुम्ही तुरटीचं पाणी झाडांना पाणी देण्यासाठी किंवा खत म्हणूनही वापरू शकता.