तिखटपणा कमी करण्यासाठी काय करायला हवं?
शेफ पंकजने सांगितले की जर डाळ किंवा कोणत्या अन्य पदार्थांमध्ये तिखट जास्त पडलं असेल तर तुम्ही त्यातील तिखटपणा कमी करण्यासाठी डेअरी प्रॉडक्टचा वापर करू शकता. जसं रस्सा भाजीमध्ये दही घालू शकता. तसेच जर सुक्या भाजीत तिखट जास्त पडलं तर त्यात देशी तूप टाकून तिखटपणा कमी करू शकता. याप्रकारे जर तुम्ही डेअर प्रॉडक्टचा वापर केल्यास तिखटपणा सहजपणे कमी होऊ शकतो.
advertisement
Knee Pain : ना औषध ना तेल, एकही रुपया खर्च न करता मिळेल गुडघेदुखीपासून आराम, फक्त 'हा' उपाय करा
नारळाच्या दुधाचा उपयोग : जर रस्सा भाजीमध्ये तिखटपणाला कमी करण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा उपयोग करू शकता. नारळाचं दूध फक्त तिखटपणाचं नाही तर जेवणाचा स्वाद सुद्धा वाढवतो.
गोड : तिखट झालेल्या पदार्थात थोडी साखर किंवा गूळ घालून जेवणातील अति तिखटपणा कमी करू शकता. ही पद्धत अशा लोकांसाठी चांगली आहे ज्यांना थोडे गोड पदार्थ खायला आवडतात.
लिंबाचा रस : लिंबाचा रस सुद्धा तिखटपणा कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो. जास्त तिखट झालेल्या पदार्थामध्ये तुम्ही लिंबाचे काही थेंब टाकू शकता ज्यामुळे तिखटपणा कमी होऊ शकेल.
बटाटा : बटाट्याच्या मदतीने तुम्ही पदार्थामधील तिखटपणा दूर करू शकता. यासाठी तुम्ही एक किंवा दोन उकडलेले बटाटे भाजीत टाका. यामुळे तिखटपणा बटाटा शोषून घेतो. यामुळे तुमचा पदार्थ हा आणखीन जास्त स्वादिष्ट आणि खाण्यायोग्य बनतो.