TRENDING:

Lie : खोटं बालताना शरीराचा 'हा' भाग होतो गरम, Human Body च्या इंटरेस्टिंग फॅक्टबद्दल फार कमी लोकांना ठावूक

Last Updated:

विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, खोटं बोलताना आपल्या मेंदूवर प्रचंड ताण येतो आणि या ताणाचे पडसाद थेट आपल्या शरीरावर उमटतात. विशेष म्हणजे, खोटं बोलताना शरीराचा एक विशिष्ट भाग चक्क गरम होतो! हे नक्की कसं घडतं आणि खोटं पकडण्याची इतर लक्षणं कोणती?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : "मी कधीच खोटं बोलत नाही!" असं म्हणणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. मग ते ऑफिसला उशीर झाल्यावर दिलेलं कारण असो किंवा मित्राला दिलेल्या पार्टीतून वाचण्यासाठी मारलेली थाप. परिस्थितीनुसार आपण सर्वच कधी ना कधी खोटं बोलतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की जेव्हा आपण खोटं बोलतो, तेव्हा आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही? उलट, आपलं शरीर अशा काही हालचाली करतं, ज्यावरून समोरच्या व्यक्तीला लगेच समजू शकतं की आपण काहीतरी लपवत आहोत.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, खोटं बोलताना आपल्या मेंदूवर प्रचंड ताण येतो आणि या ताणाचे पडसाद थेट आपल्या शरीरावर उमटतात. विशेष म्हणजे, खोटं बोलताना शरीराचा एक विशिष्ट भाग चक्क गरम होतो! हे नक्की कसं घडतं आणि खोटं पकडण्याची इतर लक्षणं कोणती? चला तर मग, या सायकॉलॉजिकल गोष्टीचं सायन्स समजून घेऊ.

खोटं बोलताना 'नाक' का होतं गरम?

advertisement

संशोधनानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलते, तेव्हा तिच्या मेंदूतील इन्सुला नावाचा भाग अधिक सक्रिय होतो. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) वाढतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, खोटं बोलताना रक्ताचा प्रवाह नाकाच्या आजूबाजूला वाढतो, ज्यामुळे नाकाचे तापमान किंचित वाढते. याला विज्ञानात पिनोकियो इफेक्ट असंही म्हणतात.

चेहऱ्यावरील हावभाव आणि नजरेची चोरी

खोटं बोलणारी व्यक्ती कितीही सराईत असली, तरी तिचा आत्मविश्वास कुठेतरी डळमळीत होतोच.

advertisement

खोटं बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलणं कठीण जातं. अशा वेळी ती व्यक्ती सतत इकडे-तिकडे बघते किंवा खाली मान घालून बोलते.

संशोधनानुसार, खोटं बोलताना आपण नेहमीपेक्षा जास्त वेळा पापण्या झपकावतो. हा तणावाचा एक नैसर्गिक परिणाम आहे.

बॉडी लँग्वेजमध्ये होणारा बदल

जेव्हा आपण खोटं बोलतो, तेव्हा आपलं शरीर फेक नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करतं, पण तिथेच गडबड होते.

advertisement

नाकाचे तापमान वाढल्यामुळे तिथे खाज सुटल्यासारखं वाटतं, म्हणूनच खोटं बोलणारे लोक वारंवार आपल्या नाकाला स्पर्श करतात किंवा नाक खाजवतात. खोटं बोलताना विचार करण्यासाठी वेळ हवा असतो. त्यामुळे लोक एकतर खूप हळू बोलतात किंवा पकडले जाऊ नये म्हणून खूप वेगाने बोलायला लागतात. काही वेळा बोलताना ते अडखळतातही.

वर दिलेले सर्व संकेत उपयुक्त असले तरी, केवळ या एकाच आधारावर कोणालाही खोटं ठरवणं चुकीचं ठरेल. काही वेळा भीती, संकोच किंवा सामाजिक दडपणामुळेही लोकांची बॉडी लँग्वेज अशीच असू शकते. खोटं पकडण्यासाठी परिस्थिती, बोलण्याचा संदर्भ आणि व्यक्तीचा स्वभाव या सर्वांचा एकत्रित विचार करणं गरजेचं असतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक चवीचा अस्सल विदर्भातील पदार्थ, उन्हाळ्यात बनवा खास सरगुंडे, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

खोटं बोलणं हे केवळ शब्दांचा खेळ नसून तो एक शारीरिक प्रतिसाद आहे. पुढच्या वेळी कोणाशी बोलताना जर समोरची व्यक्ती वारंवार नाक खाजवत असेल किंवा नजर चोरत असेल, तर समजून जा की दाल मे कुछ काला है.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Lie : खोटं बालताना शरीराचा 'हा' भाग होतो गरम, Human Body च्या इंटरेस्टिंग फॅक्टबद्दल फार कमी लोकांना ठावूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल