घरात एकटे असताना हार्ट अटॅक आल्यास काय करावे
लक्षणे ओळखा
सर्वप्रथम, तुम्हाला आलेली लक्षणे ओळखा. छातीत तीव्र वेदना, छातीवर दाब किंवा जडपणा जाणवणे, वेदना खांद्याकडे किंवा डाव्या हाताकडे पसरणे, खूप घाम येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही हृदयविकाराच्या झटक्याची मुख्य लक्षणे आहेत.
त्वरित मदत मागा
लक्षणे जाणवताच अजिबात वेळ वाया न घालवता त्वरित आपात्कालीन नंबरवर कॉल करा. भारतात १०८ वर कॉल करा किंवा कुटुंबातील कोणत्याही जवळच्या व्यक्तीला किंवा मित्राला त्वरित फोन करा. त्यांना तुम्ही कुठे आहात हे सांगा.
advertisement
लगेच बसून राहा
कोणतेही शारीरिक काम करू नका. लगेच जमिनीवर किंवा खुर्चीवर बसून राहा. शांत बसल्याने हृदयावरचा ताण कमी होतो आणि रक्ताभिसरण व्यवस्थित राहते.
ॲस्पिरिनची गोळी चघळा
जर तुम्हाला ॲस्पिरिनची ॲलर्जी नसेल आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसार तुम्ही ती घेऊ शकत असाल, तर ताबडतोब ॲस्पिरिनची एक गोळी चघळा. यामुळे रक्त पातळ होण्यास मदत होते आणि रक्ताची गाठ तयार होण्यापासून थांबवते.
कपडे सैल करा
जर तुम्ही घट्ट कपडे घातले असतील, तर ते लगेच सैल करा. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास सोपे जाईल आणि शरीरावरील दाब कमी होईल.
शांत आणि धीर धरा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शांत राहण्याचा प्रयत्न करा. भीती किंवा पॅनिकमुळे हृदयाचे ठोके वाढतात, जे स्थिती आणखी बिघडवते. दीर्घ श्वास घ्या आणि मदत येण्याची वाट पहा. हृदयविकाराचा झटका आल्यास पहिले काही मिनिटे खूप निर्णायक असतात. वरील गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही सुरक्षितपणे डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकता. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)