दुकानात उपलब्ध घटस्थापनेच्या साहित्यामध्ये आकर्षक सजवलेले घट, अखंड दिवा, नाशिकची काळी माती, विविध धान्य, पूजेचे साहित्य, ओटीचे साहित्य, पत्रावळी, स्टँड टोपल्या आणि अनेक पूरक वस्तूंचा समावेश आहे. विशेषतः 9 प्रकारच्या धान्यांचे मिश्रण 90 रुपये किलो दराने मिळते तर ओटीचे सामान 90 रुपये डझन आहे. पत्रावळ्यांमध्ये दोन प्रकार 100 चा संच 25 रुपयांना आणि 75 चा संच 25 रुपयांना उपलब्ध आहे.
advertisement
दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, “आमच्याकडे घाऊक दराने पूजेचे संपूर्ण साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांनी केवळ खरेदीच न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, ही आमची इच्छा आहे.” या संधीचा फायदा घेत अनेक महिला आणि युवकांनी व्यवसाय सुरू केला असून स्थानिक उद्योजकांकडूनही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
घटाचं मडकं इथं केवळ 18 रुपयांना तर अखंड पणत्या 20 रुपयांना मिळतात. विविध प्रकारचे गरबा देखील उपलब्ध असून, लहान गरबा 90 रुपयांना तर मोठा मंडळासाठी सजवलेला गरबा 900 रुपयांना मिळतो. हे गरबे रंगीत आणि काचेसह आकर्षक डिझाइनमध्ये सजवले आहेत. पणत्या 1 रुपयांपासून तर स्टँड टोपल्या साडेआठ रुपयांपासून 24 रुपयांपर्यंत विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.
एल वॉर्डच्या बाजूला, कुर्ला पश्चिम, सगोबर्वे मार्ग येथील हे दुकान कुर्ला स्टेशनपासून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. नवरात्रीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या घाऊक विक्रीमुळे अनेकांना परवडणाऱ्या दरात साहित्य मिळत आहे आणि त्यातून रोजगाराचाही मार्ग मोकळा झाला आहे. जेठवा पॉट्सचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.