Mumbai News : CSTM परिसरातील प्रसिद्ध खाऊ गल्ली होणार बंद; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; नेमके कारण काय?

Last Updated:

Mumbai Food Lane Faces Relocation : मुंबई शहरातील प्रसिद्ध खाऊ गल्ली लवकरच स्थलांतरित होणार आहे. गर्दी, स्वच्छतेचा अभाव आणि स्थानिक प्रशासनाच्या सुधारणा योजना यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

News18
News18
मुंबई : दररोज मुंबईत लाखो लोक प्रवासासाठी येतात. मुंबई म्हटल्यावर अनेक प्रसिद्ध स्थळे आणि खाद्यसंस्कृतीची आठवण येते. त्यात सीएसएमटी स्टेशनजवळील खाऊ गल्ली ही खूप प्रसिद्ध आहे. दररोज येथे लाखो खवय्ये आणि मुंबईत कामासाठी आलेले लोक पोट भरण्यास येतात. मात्र आता या खाऊ गल्लीसंबंधी महत्त्वाची माहिती समोर आली आहे, काही दिवसांत खाऊगल्लीवर हातोडा पडणार आहे.यासंबंधी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.
महानगरपालिकेच्या निर्णयानुसार, लवकरच टाऊन हॉल प्रकल्पासाठी ही प्रसिद्ध खाऊ गल्ली स्थलांतरित करावी लागेल. या गल्लीतील काही स्टॉल्स कॅनन पावभाजी आणि अन्य स्टॉल आहेत.काही दिवसांपूर्वी स्टॉल मालकांना तात्पुरते स्थलांतर करण्याची नोटीस दिली गेली आहे. याशिवाय, या प्रकल्पासाठी 80 वर्ष जुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हटवून त्याच जागी सुमारे 33.66 कोटी रुपयांच्या खर्चात नवीन टाऊन हॉल बांधला जाणार आहे.
advertisement
स्टॉल मालकांची प्रतिक्रिया काय आहे?
बीएमसीने मागील महिन्यात स्टॉल मालकांना नोटीस पाठवली होती, ज्यात व्यवसाय परवाना आणि कागदपत्रे दाखल करण्याचे सांगितले होते. ए वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी स्टॉल मालकांना दोन पर्याय दिले आहेत. पर्यायी स्थळी स्थलांतर करणे किंवा काम पूर्ण होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवणे. मात्र अद्याप स्थलांतराचे ठिकाण ठरलेले नाही. ए वॉर्डचे सहाय्यक महानगर आयुक्त जयदीप मोरे म्हणाले, "या प्रकल्पाच्या काळात स्टॉल्सचे तात्पुरते स्थलांतर करणे आवश्यक आहे. सध्या कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे."
advertisement
सर्वात जुनी खाऊ गल्ली असल्यामुळे स्टॉल मालक चिंतेत आहेत. एका स्टॉल मालकाने सांगितले, "आम्ही 2-3 पिढ्यांपासून येथे व्यवसाय करत आहोत. लोकांसाठी स्वस्त जेवण उपलब्ध राहणार नाही." तर दुसऱ्या स्टॉल मालकाने म्हटले, "ही जागा कामकाजी लोकांसाठी महत्त्वाची आहे.''
सीएसएमटी स्टेशनजवळील खाऊ गल्लीतील काही स्टॉल्स स्वातंत्र्यपूर्वीपासून आहेत, तर काही प्रसिद्ध सरबत स्टॉल्स आहेत. ही गल्ली मुंबईच्या शहरी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नवीन टाऊन हॉल काचेचा डोमसह बांधला जाणार आहे, ज्यातून ऐतिहासिक स्थळांचा सुंदर नजारा दिसेल.
advertisement
जुन्या जिमखान्याचे स्थलांतर महालक्ष्मी रेसकोर्सजवळील आधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये केले जाईल. पूर्ण झाल्यावर हा शहरातील दुसरा टाऊन हॉल असेल, तर पहिला एसियाटिक लायब्ररीसारखा असेल. ही खाऊ गल्ली हटल्याने पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि लोकांच्या रोजच्या जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीएमसीला निर्णय घेताना स्थानिक व्यवसाय, नागरिकांची गरज आणि शहरी विकास यांचा संतुलित विचार करणे गरजेचे आहे
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : CSTM परिसरातील प्रसिद्ध खाऊ गल्ली होणार बंद; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; नेमके कारण काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement