सागर मकरोनिया सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आलोक सिंग यांनी याबद्दल माहिती दिली त्यांच्यामते, ग्रामीण भागात लोक कधीकधी फटाक्यांमुळे भाजल्यावर किना इजा झाल्यावर उपचार करण्यासाठी टूथपेस्ट, मध किंवा हळद आणि चुना लावतात. मात्र जळल्यानंतर हे करू नये, कारण या कृतींमुळे आराम मिळण्याऐवजी त्या भागाचे नुकसान होते. म्हणून या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत.
advertisement
फटाके फोडताना अशी घ्या काळजी..
दुर्दैवाने फटाक्यांनी तुम्हाला दुखापत झाली असेल तर प्रथम 15-20 मिनिटे नळाच्या स्वच्छ पाण्याने ती जागा पूर्णपणे धुवा. त्यानंतर आपल्या घरात आढळणारे अँटीसेप्टिक क्रीम लावा. यामुळे थंडावा मिळतो आणि चिडचिड कमी होते. अशा घटना दरवर्षी घडतात. मात्र जर एखादी गंभीर घटना घडली तर शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत घ्या.
मुलांवर विशेष लक्ष ठेवा..
प्रत्येकाला वाटते की, त्यांच्यासोबत असे होणार नाही. परंतु लहानशा निष्काळजीपणामुळेही हे अपघात होऊ शकतात. म्हणून दिवाळीच्या वेळी प्रत्येकाने घरात पाणी आणि वाळूने भरलेल्या बादल्या ठेवाव्यात जेणेकरून जर एखादी दुर्घटना घडली तर ती नियंत्रित करता येईल आणि मोठी दुर्घटना टाळता येईल. फटाके फोडताना पालकांनी लहान मुलांवर लक्ष ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.