TRENDING:

Surya Namaskar Benefits : तंदुरुस्त आणि निरोगी राहायचंय ना, तर मग दैनंदिन जीवनात करा या 12 आसनांचा समावेश, हे आहेत फायदे

Last Updated:

जर तुम्ही तुमच्या दिनचर्येत योग आणि ध्यानधारणेचा समावेश केला तर तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तसेच तुम्ही तणाव टाळण्यास सक्षम असाल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिमरनजीत सिंह, प्रतिनिधी
योग
योग
advertisement

शाहजहांपुर, 27 डिसेंबर : जर तुम्हीही दैनंदिन धावपळीत व्यस्त असाल आणि तुम्हाला कसरतीसाठी वेळ काढता येत नसेल तर ताजेतवाने राहण्यासाठी तुम्हाला योग खूपच फायदेशीर ठरू शकतो. योग प्रशिक्षकांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केला तर तुम्ही दिवसभर तंदुरुस्त आणि निरोगी राहाल. इतकेच नव्हे तर तुमची काम करण्याची क्षमताही वाढेल आणि तुमचे मनही शांत राहील.

advertisement

उत्तरप्रदेश राज्यातील शाहजहांपुर जिल्हा रुग्णालयातील योग आणि निसर्गोपचार केंद्रातील योग प्रशिक्षक अभिनव शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, जर तुम्ही तुमच्या दिनचर्येत योग आणि ध्यानधारणेचा समावेश केला तर तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तसेच तुम्ही तणाव टाळण्यास सक्षम असाल. तुम्ही सूर्यनमस्कार तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केले तर तुमच्यामध्ये बिबट्यासारखी स्फूर्ती निर्माण होईल.

advertisement

सूर्यनमस्काराची 12 आसने कोणती -

योग प्रशिक्षक अभिनव शुक्ला यांनी सांगितले की, सूर्यनमस्कार हे 12 पायऱ्यांमध्ये केले जाणारे आसन आहे. यामध्ये प्रणामासन, हस्तोत्तानासन, हस्तपादासन, अश्व संचरणासन, दंडासन, अष्टांग नमस्कार, भुजंगासन, अधो मुख स्वानासन, अश्व संचरणासन, हस्तपदासन, हस्तोत्तानासन आणि ताडासन यांचा समावेश आहे. ही सोपी गोष्ट रोज केल्याने तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहाल.

advertisement

रोज योग केल्याने होतो फायदा -

योग शिक्षक अभिनव शुक्ला म्हणाले की, सूर्यनमस्काराचे सर्व सोपी आसने केल्याने पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक होतो. संपूर्ण पाठीचा कणा आणि पॅरास्पाइनल भागात रक्त परिसंचरण सुधारले आहे. पचनक्रिया सुधारते. निद्रानाश दूर होण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर यामुळे मधुमेहाबाबतही फायदा होतो आणि तणावावरही मुक्ती मिळते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Surya Namaskar Benefits : तंदुरुस्त आणि निरोगी राहायचंय ना, तर मग दैनंदिन जीवनात करा या 12 आसनांचा समावेश, हे आहेत फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल