उपाशीपोटी कोणते गरम मसाले आरोग्यासाठी घातक ठरू शकतात?
दालचिनी
अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे. मात्र दालचिनी ही गरम प्रवृत्तीची असल्याने सकाळी रिकाम्या पोटी दालचिनी गरम पाण्याक उकळवून प्यायल्याने त्रास होऊ शकते. दालचिनीमुळे घशात जळजळ आणि ॲसिडिटी होऊ शकते. शिवाय पोटदुखीच्या तक्रारीही वाढू शकतात.
advertisement
काळी मिरी
काळी मिरी ही पचनासाठी फायदेशीर आहे. मात्र ती रिकाम्या पोटी घेतल्यास घशाची आणि पोटाची जळजळ आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रिकाम्यापोटी काळी मिरी खाल्ल्यामुळे फायद्याऐवजी नुकसानच होण्याची भीती अधिक आहे.
लवंग
लवंग ही अनेक आजारांवर गुणकारी आहे. सर्दी-खोकल्याच्या वेळी लवंग खाल्ली जाते किंवा ती गरम करून तिचा वास घेतला जातो. मात्र रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
ओवा
ओवा हा उष्ण प्रकृतीचा आहे असून तो पचनासाठी फायद्याचा आहे. मात्र सतत रिकाम्या पोटी घेतल्याने ओवा घेतल्याने पोटात जळजळ वाढू शकते किंवा गॅसेसचा त्रास होऊ शकतो.
मेथी
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी मेथी फायद्याची आहे. परंतु रिकाम्या पोटी मेथी खाल्ल्यास जठराची जळजळ आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकते. ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे अशांनी तर रिकाम्यापोटी मेथी खाणं टाळावं कारण त्यांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो. जर उपाशी पोटी मेथी खाण्याचं प्रमाण जास्त असेल अल्सरचा सुद्धा त्रास होऊ शकतो.
तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी गरम मसाल्यांचा वापर करत असाल तो तर थांबवावा. गरम मसाल्याचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घ्यावा.