ताण वेगळ्या स्वरुपात पण प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. नोकरी, घर सांभाळून तरुण स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण कधीकधी नकळत काही सवयींमुळे हृदयाचं आरोग्य बिघडू शकतं. याबद्दल नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून यामागची महत्त्वाची कारणं समोर आली आहेत. तणाव, कमी झोप आणि जास्त प्रमाणात मद्यपान यामुळे तरुणांमधे हृदयरोगाचा धोका वाढत आहे.
Neem Leaves : आरोग्यासाठी फायदेशीर कडुनिंब, शरीराचं सुरक्षा कवच असलेली औषधी वनस्पती
advertisement
हेल्थ डेटा सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासात आलेली निरीक्षणं पाहूया. झोपेची गुणवत्ता आणि नियमितता ही हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सात वर्ष चाललेल्या या संशोधनात नव्वद हजार जणांचा अभ्यास करण्यात आला. यातून आलेला निष्कर्ष डोळे उघडणारा आहे, कारण कमी झोपेमुळे हृदयरोग, मधुमेह आणि मानसिक आजारांचा धोका वाढतोय. त्यामुळे यापुढे कमी झोपत असाल तर या परिणामांबद्दलची माहिती आठवा आणि त्याप्रमाणे बदल करा.
कारणं आणि परिणाम -
ताण : ताण आता फक्त मानसिक समस्या राहिलेली नाही, तर त्याचा शरीरावरही वाईट परिणाम होतो. सतत ताणतणाव असतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं, ज्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. या दोन गोष्टींमुळे हृदयरोग होऊ शकतो.
कमी झोप: ज्यांची झोप सहा तासांपेक्षा कमी आहे त्यांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो. यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासातली माहिती पाहूया. झोपेच्या कमतरतेमुळे शरीराच्या दुरुस्ती प्रक्रियेत व्यत्यय येतो, ज्यामुळे हृदयावर दबाव वाढतो. अनियमित झोपेचा संबंध मधुमेह, उच्च रक्तदाब आणि नैराश्यासारख्या आजारांशी देखील आहे.
जास्त प्रमाणात मद्यपान : या अभ्यासातल्या काही प्रकरणांत मद्यपान मर्यादित प्रमाणात केल्यानं नुकसान होत नाही, पण रोज केलं जातं असेल तर त्याचा हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्यानं रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि कोलेस्टेरॉलची पातळी बिघडते. त्यामुळे तरुणांमधे हृदयविकाराच्या घटनांमधे मद्यपान हे एक प्रमुख कारण बनत आहे.
Aging Foods : या पदार्थांना ठेवा दूर, त्वचा दिसेल सतेज, चमकदार, या टिप्सचा होईल उपयोग
संशोधनातून समोर आलेली महत्त्वाची निरीक्षणं -
20 ते 40 वयोगटातील तरुणांमधे हृदयरोगाचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय.
वाईट जीवनशैली, ताणतणाव, झोपेचा अभाव आणि मद्यपान ही याची प्रमुख कारणं आहेत.
भारतात 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमधे हृदयविकाराचं प्रमाण विकसित देशांपेक्षा जास्त आहे. अभ्यासातून समोर आलेलं हे धक्कादायक निरीक्षण आहे.
कसं टाळता येईल?
तणाव कमी करा- योग, ध्यान आणि वेळेचं व्यवस्थापन करून ताण नियंत्रित करता येतो.
झोप सुधारा- दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा, स्क्रीन टाइम कमी करा.
दारूपासून दूर राहा - दारूचं सेवन पूर्णपणे थांबवा किंवा मर्यादित करा.
नियमित तपासणी - रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियमितपणे तपासा.
निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा - संतुलित आहार घ्या, दररोज हलके व्यायाम करा.
