Aging Foods : या पदार्थांना ठेवा दूर, त्वचा दिसेल सतेज, चमकदार, या टिप्सचा होईल उपयोग

Last Updated:

योग्य अन्न निवडणं तब्येतीसाठी खूप महत्वाचं आहे. चुकीच्या अन्नामुळे वृद्धत्वाची लक्षणं म्हणजे, सुरकुत्या येणं, चेहऱ्यावर मुरुम येणं ही लक्षणं दिसतातच तसंच पोटही खराब होऊ लागतं. आहारात निरोगी पदार्थांचा समावेश केला तर शरीर पूर्वीपेक्षा जास्त तंदुरुस्त दिसतं, त्वचा सुधारते, पोट निरोगी राहतं, एकूण आरोग्य सुधारतं आणि त्वचा तरुण दिसते. 

News18
News18
मुंबई : आपण जे खातो - पितो त्याचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो. यात विषारी किंवा गोड पदार्थ असले तर लठ्ठपणा वाढतो. त्वचेची चमक कमी होते.
त्वचा तरुण दिसावी आणि शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहावं असं प्रत्येकाला वाटतं पण यासाठी तुमच्या पोटात काय जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आहारातल्या चुकांमुळे त्वचा वृद्ध दिसायला सुरुवात होते.
योग्य अन्न निवडणं खूप महत्वाचं आहे. का ते पाहूया, चुकीच्या अन्नामुळे वृद्धत्वाची लक्षणं म्हणजे, सुरकुत्या येणं, चेहऱ्यावर मुरुम येणं ही लक्षणं दिसतातच तसंच पोटही खराब होऊ लागतं. आहारात निरोगी पदार्थांचा समावेश केला तर शरीर पूर्वीपेक्षा जास्त तंदुरुस्त दिसतं, त्वचा सुधारते, पोट निरोगी राहतं, एकूण आरोग्य सुधारतं आणि त्वचा तरुण दिसते.
advertisement
होलिस्टिक न्यूट्रिशनिस्ट देवयानी शर्मा यांनी यासंदर्भात काही निरीक्षणं नोंदवली आहेत. त्यांच्या निरीक्षणानुसार पाच पदार्थ त्वचेला चांगल्यापेक्षा नुकसान जास्त करतात. हे पदार्थ वृद्धत्वाची प्रक्रिया वाढवतात.
कोणते पदार्थ त्वचेचं वय लवकर वाढवतात ?
advertisement
देवयानी यांच्या मते, नियमितपणे काही पदार्थ खाल्ले तर वय लवकर वाढण्याची चिन्हं दिसू लागतात. यामुळे चेहरा सुजलेला दिसतो, चेहऱ्यावर बारीक रेषा दिसतात आणि त्वचा कोरडी किंवा तेलकट दिसते.
साखर - साखर जास्त प्रमाणात खाल्ली तर वृद्धत्वाची प्रक्रिया वेगानं होते. साखरेमुळे शरीरातलं ग्लायकेशन वाढतं, ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि सैल दिसते.
पांढरा ब्रेड आणि पास्ता - पांढरा ब्रेड किंवा पास्ता खाल्ला तरी आहारात या दोन्ही पदार्थांचं प्रमाण कमी ठेवणं आवश्यक आहे. कारण हे दोन्ही पदार्थ हाय ग्लायसेमिक पदार्थ म्हणून गणले जातात आणि रक्तातील साखरेसाठी आणि कोलेजनचं विघटन करण्यासाठी हानिकारक आहेत. त्वचेची लवचिकता राखण्यासाठी कोलेजन आवश्यक आहे.
advertisement
मीठ जास्त असलेले पदार्थ - खारट चिप्स किंवा इतर पदार्थांमधे जास्त प्रमाणात सोडियम असतं. जास्त सोडियममुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू शकते.
अल्कोहोल - जास्त प्रमाणात अल्कोहोल प्यायल्यानं त्वचा डिहायड्रेट होते. त्यामुळे त्वचा निस्तेज दिसते आणि कोरडेपणा येतो. म्हणूनच अल्कोहोलचं सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
ट्रान्स फॅट्स - प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधे म्हणजेच प्रोसेस्ड फूडमधे ट्रान्स फॅट्स असतात. यामुळे शरीरात फ्री रॅडिकल्स वाढतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया वेगानं होते. अशा परिस्थितीत, ट्रान्स फॅट्स असलेले पदार्थ खाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Aging Foods : या पदार्थांना ठेवा दूर, त्वचा दिसेल सतेज, चमकदार, या टिप्सचा होईल उपयोग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement