Overthinking : अतिविचारांवर ठेवा नियंत्रण, मानसिक आरोग्यावर ताबा मिळवणं शक्य, या टिप्स ठरतील उपयुक्त

Last Updated:

जीवनशैलीतल्या बदलांमुळे आणि वाढत्या ताणतणावामुळे मन शांत ठेवणं आव्हानात्मक ठरतंय. यासाठी योग्य पद्धत अवलंबून विचारांवर नियंत्रण ठेवणं आणि मानसिक आरोग्य सुधारणं शक्य आहे. यासाठी काही टिप्स तुम्हाला उपयोगी येतील.

News18
News18
मुंबई : विचार करणं, विचारात मग्न होणं, विचार करताना तंद्री लागणं हे आपण ऐकून असतो. पण मन नेहमीच कोणत्या ना कोणत्या विचारात अडकलेलं असेल तर ते अतिविचाराचं लक्षण असू शकतं. जीवनशैलीतल्या बदलांमुळे आणि वाढत्या ताणतणावामुळे मन शांत ठेवणं आव्हानात्मक ठरतंय.
यासाठी योग्य पद्धत अवलंबून विचारांवर नियंत्रण ठेवणं आणि मानसिक आरोग्य सुधारणं शक्य आहे. यासाठी काही टिप्स तुम्हाला उपयोगी येतील.
आवडतं काम करा.
अतिविचार आणि मनातला गोंधळ कमी करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे आवडणाऱ्या गोष्टी करणं. संगीत ऐकणं, चित्रकला, बागकाम किंवा स्वयंपाक असे अनेक पर्याय आहेत. आवडीचं काम केल्यानं मन शांत होतं आणि सकारात्मक वाटतं.
advertisement
व्यायामाची सवय लावा.
मनात सतत विचार येत असतील तर व्यायाम हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. व्यायाम केल्यानं शरीर सक्रिय राहतंच, शिवाय मनही ताजंतवानं होतं आणि शांत वाटतं. दररोज केवळ वीस-तीस मिनिटं व्यायाम केल्यानं अतिविचार करण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतं.
advertisement
विचार लिहून ठेवा.
अनेकदा मनात खूप विचार येतात, त्यावर नियंत्रण कसं करायचं कळत नाही. यासाठी, विचार कागदावर लिहायला सुरुवात करा. डायरी लिहिल्यानं मन हलकं होतं आणि यामुळे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
प्रवास करा.
जास्त विचार करण्यानं किंवा काहीही न करण्यानं मन अधिक भरटकत राहतं. यासाठी बाहेर पडा, कारण अशावेळी निसर्गाशी जोडलं जाणं अत्यंत फायदेशीर आहे. दररोज थोडा वेळ फिरायला जाणं, उद्यानात वेळ घालवणं किंवा मित्रांसोबत बाहेर जाणे यामुळे मनाला आराम मिळतो आणि अतिविचार कमी होतो.
advertisement
हे उपाय केल्यानंतरही अतिविचाराची सवय जात नसेल त्याचा मानसिक त्रास होत असेल तर मनोवैज्ञानिकांचा सल्ला घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Overthinking : अतिविचारांवर ठेवा नियंत्रण, मानसिक आरोग्यावर ताबा मिळवणं शक्य, या टिप्स ठरतील उपयुक्त
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement