Vitamins Deficiency : जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे वाटू शकते चिंता, मज्जासंस्थेवर होतो परिणाम, वाचा सविस्तर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
अस्वस्थ वाटणं, घाबरणं हे नेहमीच मानसिक समस्येमुळे होतं असं नाही. बऱ्याचदा यामागे, व्हिटॅमिन बी 12, बी 6 आणि डी ची कमतरता हे कारण असतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यासाठी आहारात योग्य बदल केल्यानं घाबरण्याचं, अस्वस्थ वाटण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
मुंबई : काही कारणांमुळे चिंता वाटणं, घाबरणं, ताण येणं असं होऊ शकतं. पण खूप ताण किंवा चिंता नसताना, अचानक घाबरायला होत असेल तर हे शरीरातील काही कमतरतांचं लक्षण असू शकतं.
कधीकधी मानसिक ताण, थकवा किंवा झोपेच्या कमतरतेमुळे असं घडू शकतं. पण अनेक वेळा शरीरात पोषक घटकांचा अभाव देखील यासाठी जबाबदार असतो. काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे, मज्जासंस्था कमकुवत होते आणि मेंदू योग्यरित्या काम करू शकत नाही.
advertisement
कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे त्रास होऊ शकतो पाहूया -
व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता
बहुतेकदा चिंता वाटणं किंवा घाबरणं हे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे होऊ शकतं. विशेषतः व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन बी 6. व्हिटॅमिन बी 12 मेंदू आणि नसांसाठी आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे मेंदूला योग्य सिग्नल मिळत नाहीत, ज्यामुळे अस्वस्थता, चिंता, नैराश्य आणि थकवा येतो.
advertisement
व्हिटॅमिन बी6 मुळे सेरोटोनिन आणि डोपामाइनसारखे मूड वाढवणारे हार्मोन्स तयार करण्यास मदत होते. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे व्यक्तीची चिडचिड, अस्वस्थता वाढणं आणि चिंता वाटणं असे प्रकार होऊ शकतात. अन्न स्रोतांमधे अंडी, दूध, दही, मासे, हिरव्या भाज्या, केळी, डाळी आणि सुकामेवा यांचा समावेश आहे.
व्हिटॅमिन डीची कमतरता
अनेकदा जीवनशैलीमुळे सूर्यप्रकाश मिळत नाही. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा महत्त्वाच स्रोत आहे. केवळ हाडांसाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील व्हिटॅमिन डी महत्वाचं आहे. त्याच्या कमतरतेमुळे थकवा, नैराश्य, चिंता आणि झोपेच्या समस्या उद्भवतात.
advertisement
व्हिटॅमिन डीची कमतरता असते तेव्हा चिंता, अस्वस्थ वाटणं आणि मूड स्विंग होण्याची शक्यता जास्त असल्याचं संशोधनात आढळून आलं आहे. कोवळ्या सूर्यप्रकाशात जाऊन बसणं तसंच दूध, अंड्याचा पिवळा भाग, मशरूम आणि चरबीयुक्त मासे (सॅल्मन, ट्यूना) पासून देखील व्हिटॅमिन डी मिळतं.
advertisement
मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्वं
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळेही चिंता आणि अस्वस्थता जाणवते. हे खनिज शरीराला आराम देण्यासाठी आणि मज्जासंस्था शांत करण्यासाठी मदत करतं. यासाठी काजू, बदाम, पालक, भोपळ्याच्या बिया, ब्राऊन राईस आणि संपूर्ण धान्य म्हणजेच गहू, बार्ली, मका, बाजरी इत्यादीचा समावेश करावा.
चिंता कमी करण्यासाठी काय करावं ?
संतुलित आहार घ्या आणि हिरव्या भाज्या, फळं, दूध-दही, अंडी आणि कडधान्यांचा समावेश करा. दररोज किमान 15-20 मिनिटं सूर्यप्रकाश घ्या, जेणेकरून व्हिटॅमिन डीची कमतरता भासू नये. अतिरिक्त कॅफिन (चहा, कॉफी) आणि जंक फूड टाळा. योग, ध्यान आणि दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.
advertisement
अस्वस्थ वाटणं, घाबरणं हे नेहमीच मानसिक समस्येमुळे होतं असं नाही. बऱ्याचदा यामागे, व्हिटॅमिन बी 12, बी 6 आणि डी ची कमतरता हे कारण असतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. योग्य वेळी आहार आणि पूरक आहारांद्वारे बदल केला तर घाबरण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 11:58 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamins Deficiency : जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे वाटू शकते चिंता, मज्जासंस्थेवर होतो परिणाम, वाचा सविस्तर