Glass Skin : सणासुदीच्या दिवसात दिसा स्पेशल, ग्लास स्किनसाठी वापरा या खास टिप्स

Last Updated:

ग्लास स्किन ही एक कोरियन सौंदर्य संकल्पना आहे ज्यात चेहरा काचेसारखा चकाकता आणि स्पष्ट दिसतो. विशेषतः मुली ग्लास स्किन मिळवण्यासाठी विविध प्रकारची उत्पादनं वापरतात किंवा घरगुती उपाय करून पाहतात. यासाठी कोरफड, गुलाबजलाचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

News18
News18
मुंबई : चेहऱ्याची निगा राखण्यासाठीच्या टिप्स तुम्ही वाचत असाल तर त्यात एक शब्द आढळतो. ग्लास स्किन. ग्लास स्किन हवी असेल तर काय करायचं असा प्रश्न तुम्हालाही असेल तर ही माहिती तुमच्यासाठी. आधी ग्लास स्किन म्हणजे काय ते समजून घेऊया.
ग्लास स्किन म्हणजे काय ?
ग्लास स्किन ही एक कोरियन सौंदर्य संकल्पना आहे ज्यात चेहरा काचेसारखा चकाकता आणि स्पष्ट दिसतो. विशेषतः मुली ग्लास स्किन मिळवण्यासाठी विविध प्रकारची उत्पादनं वापरतात किंवा घरगुती उपाय करून पाहतात.
त्वचेसाठी कोरफड फायदेशीर आहे. कोरफडीमुळे त्वचा हायड्रेट होते, चेहरा ताजातवाना दिसतो, त्वचा उजळ दिसते. कारण कोरफडीत आढळणारे नैसर्गिक दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत.
advertisement
ग्लास स्किनसाठी चेहऱ्यावर कोरफडीचा वापर कसा करायचा यासाठी निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज दास यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही रेसिपी शेअर केली आहे.
यासाठी, कोरफडीचा गर फ्रिजरमधे ठेऊन त्याचे आईस क्युब करुन घ्यावेत. यासाठी दोन चमचे कोरफडीचा गर आणि सहा चमचे गुलाबजल एकत्र करुन फ्रिजरमधे ठेवावं. हे आईस क्युब चेहऱ्यावर लावावेत. आईस क्युबमुळे चेहऱ्यावरची धूळ निघायला मदत होईल.
advertisement
चेहऱ्यावर डाग असतील, उघडी छिद्र असतील किंवा त्वचा निस्तेज झा़ली असेल, हे कोरफडीचे आईस क्युब लावणं फायदेशीर आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी, बर्फ चेहऱ्यावर घासून सुकू द्यावा लागेल. चेहरा न धुता झोपा, दुसऱ्या दिवशी सकाळी त्वचा चमकदार दिसेल.
advertisement
तांदळाचं पाणी
ग्लास स्किन मिळवण्यासाठी, चेहऱ्यावर तांदळाचं पाणी देखील लावू शकता. यासाठी तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवा आणि नंतर तांदूळ पाण्यातून वेगळे करा आणि तांदळाचं पाणी चेहऱ्यावर लावा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Glass Skin : सणासुदीच्या दिवसात दिसा स्पेशल, ग्लास स्किनसाठी वापरा या खास टिप्स
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्याची किंमत किती?
चांदीत ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्याची किंम
  • चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्या

  • चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्या

  • चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, प्रति तोळ्या

View All
advertisement