Bhadrasana : गुडघेदुखी आणि पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय - भद्रासन, वाचा भद्रासनाचे फायदे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
भद्रासन हे 'भद्र' म्हणजे शुभ आणि 'आसन' म्हणजे बसण्याची मुद्रा या दोन शब्दांपासून बनलं आहे. भद्रासन केल्यानं संपूर्ण शरीराचे स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. या आसनानं मांड्या, गुडघे आणि कंबरेचे स्नायू मजबूत होतात. नियमित सरावानं शरीरात लवचिकता वाढते आणि ताण येण्याची समस्या दूर होते. पाठ आणि कंबरेचे स्नायू मजबूत होत असल्यानं शरीर स्थिर राहतं.
मुंबई : योगासनांमुळे शरीरच नाही तर मनालाही आराम मिळतो. भद्रासन हे योगासनांमधलं एक सोपं आसन आहे. या आसनानं शरीराला बळकटी मिळते आणि मनही फ्रेश वाटतं. दररोज काही मिनिटं हे आसन केल्यानं मन तणावमुक्त राहते.
भद्रासन हे 'भद्र' म्हणजे शुभ आणि 'आसन' म्हणजे बसण्याची मुद्रा या दोन शब्दांपासून बनलं आहे. भद्रासन केल्यानं संपूर्ण शरीराचे स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. या आसनानं मांड्या, गुडघे आणि कंबरेचे स्नायू मजबूत होतात. नियमित सरावानं शरीरात लवचिकता वाढते आणि ताण येण्याची समस्या दूर होते. पाठ आणि कंबरेचे स्नायू मजबूत होत असल्यानं शरीर स्थिर राहतं. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'एक्स' पोस्टमधे तसंच इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे हे आसन सांध्यासाठी कसं फायदेशीर याची माहिती दिली आहे. या आसनानं, गुडघेदुखी देखील कमी होते.
advertisement
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त
या आसनानं पोटाशी संबंधित अनेक समस्या कमी होतात. तसंच, पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात. अन्नाचं पचन चांगलं होते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
भद्रासन हे गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आसन आहे. यामुळे कंबर आणि मांड्यांचे स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे प्रसूती सुलभ होते. तसंच, यामुळे मन शांत करुन ताण कमी करायला मदत होते. याशिवाय, मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या समस्यांपासून देखील यामुळे आराम मिळतो.
advertisement
एकाग्रता
भद्रासनामुळे एकाग्रता वाढते. डोकेदुखी, पाठदुखी, डोळ्यांची कमजोरी, निद्रानाश आणि उचकी यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
भद्रासन कसं करावं ?
भद्रासन करण्यासाठी, सर्वप्रथम, जमिनीवर पाय आडवे करून बसा. पाय जमिनीला चांगले चिकटलेले असावेत. दोन्ही पाय हळूहळू बाहेरच्या दिशेनं पसरवा आणि तळवे एकमेकांसमोर आणा. पायांचे तळवे एकमेकांशी जोडा.
advertisement
यानंतर, दोन्ही हातांनी पाय धरा. कोपर गुडघ्यांवर हलका दाब देऊन ठेवा जेणेकरून गुडघे जमिनीवर टेकतील. पाठीचा कणा सरळ ठेवा आणि खांदे आरामशीर ठेवा. डोकं सरळ ठेवा आणि पुढे पहा. खोल आणि हळू श्वास घ्या. श्वास आत घेताना, पाठीचा कणा सरळ करा आणि श्वास सोडताना, शरीराला आराम द्या. दोन-पाच मिनिटं या स्थितीत रहा. क्षमतेनुसार हळूहळू वेळ वाढवा.
advertisement
या आसनाला बटरफ्लाय पोज किंवा ग्रेशियस पोजही म्हणतात. तुम्हाला कोणतीही व्याधी असेल तर हे आसन करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 5:54 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bhadrasana : गुडघेदुखी आणि पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय - भद्रासन, वाचा भद्रासनाचे फायदे