advertisement

Vitamin D : पाठदुखी-कंबरदुखीचं मूळ कारण शोधा, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वाढू शकतं दुखणं

Last Updated:

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे वारंवार पाठदुखीचा सामना करावा लागू शकतो. व्हिटॅमिन डी म्हणजेच जीवनसत्व ड हाडं आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. यामुळे शरीरात कॅल्शियम शोषण्यास मदत होते. व्हिटॅमिन डीची कमतरता असते तेव्हा कॅल्शियम योग्यरित्या शोषलं जात नाही, ज्यामुळे हाडं कमकुवत होतात. यामुळे पाठ आणि कंबर दुखणं, स्नायूंमधे ताठरपणा येतो आणि थकवा जाणवतो.

News18
News18
मुंबई : जास्त वेळ बसणं, बसण्याची चुकीची पद्धत आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे कंबर आणि पाठदुखीचा त्रास तरुणांनाही होतो आहे. यामागचं आणखी एक कारण लक्षात घ्यायला हवं ते म्हणजे विशिष्ट जीवनसत्वाची कमतरता.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे वारंवार पाठदुखीचा सामना करावा लागू शकतो. व्हिटॅमिन डी म्हणजेच जीवनसत्व ड हाडं आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. यामुळे शरीरात कॅल्शियम शोषण्यास मदत होते. पण व्हिटॅमिन डीची कमतरता असते तेव्हा कॅल्शियम योग्यरित्या शोषलं जात नाही, ज्यामुळे हाडं कमकुवत होतात. यामुळे पाठ आणि कंबर दुखणं, स्नायूंमधे ताठरपणा येतो आणि थकवा जाणवतो.
advertisement
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणं
नेहमी थकवा जाणवणं
हाडं आणि सांधेदुखी
स्नायू कमकुवत होणं
वारंवार सर्दी आणि संसर्ग किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती
बराच काळ पाठदुखीचा त्रास होत असेल आणि ही लक्षणं जाणवत असतील, तर व्हिटॅमिन डी पातळीची तपासणी करणं, म्हणजेच आवश्यकतेपेक्षा याचं प्रमाण किती कमी आहे हे तपासणं गरजेचं आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
व्हिटॅमिन डीची पातळी कशी वाढवायची ?
योगगुरू हंसा योगेंद्र यांच्या मते दररोज दहा-पंधरा मिनिटं उन्हात बसल्यानं शरीरात व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते. यासाठी आहारात दूध, दही, चीज, मशरूम, पालक, बदाम, अंजीर, मनुका आणि सुके आलुबुखार म्हणजेच प्लमचा समावेश करा. यामधे व्हिटॅमिन डीचं प्रमाण चांगलं असतं.
advertisement
औषधांव्यतिरिक्त व्हिटॅमिन सप्लिमेंटचाही पर्याय आहे पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamin D : पाठदुखी-कंबरदुखीचं मूळ कारण शोधा, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वाढू शकतं दुखणं
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement