हृदय शरीरातील सर्वात महत्वाचा स्नायू आहे आणि ते निरोगी ठेवण्यासाठी केवळ आहारच नाही तर व्यायाम देखील आवश्यक आहे. यासाठी, खूप वेळ व्यायाम करत नसलात तरी, दररोज तीस मिनिटं वेगानं चालणं देखील तब्येतीसाठी महत्त्वाचं आहे.
Hair Fall : हिवाळ्यात केस का गळतात ? केस गळती रोखण्यासाठी काय करावं ?
एरोबिक व्यायाम - या व्यायामाला कार्डिओ म्हणतात. स्टॅमिना वाढवण्यासाठी हा व्यायाम खूप चांगला मानला जातो. एरोबिक व्यायाम करता तेव्हा हृदय गती वाढते आणि घाम येतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्तदाब कमी होतो. एरोबिक व्यायामासाठी, चालण, पोहण, जॉगिंग करू शकता आणि बॅडमिंटन आणि बास्केटबॉलसारखे खेळ देखील खेळू शकता.
advertisement
स्ट्रेंथ ट्रेनिंग - यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. एरोबिक व्यायामासह स्ट्रेंथ ट्रेनिंग एकत्रित केल्यानं चांगलं कोलेस्ट्रॉल पातळी वाढवण्यासाठी आणि वाईट कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. स्ट्रेंथ ट्रेनिंग घेण्यापूर्वी नेहमीच डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
स्ट्रेचिंग एक्सरसाइज - या व्यायामामुळे हृदयाचं आरोग्य सुधारत नसलं तरी, यामुळे लवचिकता सुधारते. यामुळे स्नायूंमधे पेटके येणं, सांधेदुखी आणि व्यायामादरम्यान येणारा स्नायूंवरचा ताण टाळता येतो.
या गोष्टी लक्षात ठेवा-
- कोणत्याही व्यायामापूर्वी वॉर्म अप करायला विसरू नका. यामुळे हृदयाचे ठोके हळूहळू वाढतात, हृदयावर अचानक ताण येण्यापासून रोखतात आणि व्यायामादरम्यान उच्च हृदय गतीचा धोका कमी होतो.
Electrolytes: अतिरेक ठरेल धोकादायक, वाचा इलेक्ट्राल जास्त पिण्याचे धोके
- व्यायामानंतर कुल डाऊन देखील तितकंचं महत्वाचं आहे. व्यायामानंतर, हृदयाची गती आणि शरीराचं तापमान वाढतं. अचानक व्यायाम थांबवल्यानं चक्कर येऊ शकते.
- कूल-डाऊन सेशन दरम्यान स्ट्रेचिंग व्यायाम करण्याची शिफारस केली जाते, कारण ते स्नायूंमध्ये लॅक्टिक अॅसिड जमा होण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करू शकतात. यामुळे स्नायूंमध्ये पेटके किंवा कडकपणा येण्याचा धोका कमी होऊ शकतो.
- कोणतेही व्यायाम करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
