या वाढणाऱ्या घटनांमुळे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली म्हणजे, व्यायामशाळा किंवा कोणत्याही प्रकारची कसरत सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या आरोग्य चाचण्या करणं आवश्यक आहे. यामुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्याची कल्पना येईलच, शिवाय शरीर इतक्या शारीरिक हालचालींसाठी तयार आहे की नाही हे देखील कळेल.
Meningitis : मेंदूची सूज आरोग्यासाठी धोकादायक, वेळीच लक्षणं ओळखा, सावध राहा
advertisement
तिशीच्या टप्प्यावर चाचण्या का महत्त्वाच्या ?
ही चाचणी करणं तीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी विशेषतः महत्त्वाची आहे. याशिवाय, ज्यांच्या कुटुंबात आधी हृदयरोगाच्या घटना घडल्यात किंवा खूप दिवसांनी पुन्हा कसरत सुरू करत आहेत त्यांच्यासाठी हे विशेषतः महत्त्वाचं आहे. या चाचण्यांमुळे हृदयरोग असेल तर कळू शकतं. वेळेवर आढळल्यानं मोठा धोका टाळता येतो. त्याप्रमाणे काळजी घेता येते.
महत्त्वाची चाचण्या -
ईसीजी- या चाचणीमुळे हृदयाचा इलेक्ट्रिक अॅक्टिव्हिटी रेकॉर्डची नोंद कळते आणि हृदयाच्या लयीत अडथळा, कंडक्शन ब्लॉक किंवा सायलेंट हार्ट अॅटॅकचा रेकॉर्डही कळतो.
2डी इको- ही चाचणी अल्ट्रासाऊंडद्वारे हृदयाची रचना आणि कार्यप्रणाली पाहते. यामुळे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथीसारखे गंभीर आजार आढळू शकतात ज्यामुळे कधीकधी अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
टीएमटी- नियंत्रित परिस्थितीत व्यायामादरम्यान हृदयाचं कार्य तपासले जाते. हार्ट इंटेसिटी वर्कआऊट करणाऱ्यांसाठी ही चाचणी खूप उपयुक्त मानली जाते.
Vitamin D : व्हिटॅमिन डीचं अतिरिक्त सेवन ठरेल धोकादायक, शरीरावर होतील गंभीर परिणाम
कार्डियाक बायोमार्कर्स- या रक्त चाचणीत हृदयाच्या स्नायूंना होणारा दाब किंवा सौम्य नुकसान दिसून येतं.
इन्फ्लमेटरी मार्कर - या चाचणीतून शरीरात सूज किती आहे ते कळतं. या चाचणीद्वारे धमन्यांत प्लाक तयार होण्याचा धोका समजू शकतो.
लिपिड प्रोफाइल आणि HbA1c - या चाचणीमुळे गेल्या 3 महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेच्या पातळीसह कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी समजते. मधुमेह आणि मेट्रोबोलिक सिंड्रोमचा धोका मोजण्यासाठी देखील ही चाचणी उपयुक्त आहे.
व्हिटॅमिन चाचण्याही आवश्यक -
व्हिटॅमिन डी आणि बी12 च्या कमतरतेमुळे शरीराला आवश्यक ऊर्जा, हाडं आणि स्नायूंच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. म्हणून, ही चाचणी करणं देखील महत्त्वाचं आहे.
या सर्व चाचण्या करणं आवश्यक आहे. कुठला त्रास होत नाही म्हणून याकडे दुर्लक्ष करु नका. या चाचण्या जीवरक्षक उपाय आहेत. या चाचण्या झाल्याशिवाय जिमला जाऊ नका जिमला जाण्याआधी डॉक्टरांकडे जा. वेळीच खबरदारी घेतली तर अचानक येणारा हृदयविकाराचा झटका किंवा प्राणघातक हृदयविकाराचा धोका टाळता येतो.
