Vitamin D : व्हिटॅमिन डीचं अतिरिक्त सेवन ठरेल धोकादायक, शरीरावर होतील गंभीर परिणाम
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जसा वाईट तसं शरीरात जीवनसत्वाचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त होणंही वाईटच. तज्ज्ञांच्या सल्ल्याचा विचार न करता, निर्धारित डोसपेक्षा जास्त औषध घेतल्यानं रक्तात कॅल्शियम जमा होऊ लागते, जे भविष्यात तुमच्यासाठी गंभीर ठरू शकतं.
मुंबई : माहिती व्हिटॅमिन डी बद्दलची... एरवी 'व्हिटॅमिन डी' च्या कमतरतेविषयीची माहिती असते. पण ही माहिती आहे डी व्हिटॅमिनच्या अतिरिक्त सेवनामुळे होणाऱ्या शरीराच्या हानीबद्दलची.
व्हिटॅमिन डी म्हणजेच जीवनसत्व ड आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. शरीरात या जीवनसत्वाची कमतरता असेल तर ते आपल्यासाठी खूप धोकादायक ठरतं. कमतरतेमुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं, हाडांत वेदना होऊ लागतात, तसंच नैराश्य येणं आणि मूड स्विंगचं प्रमाण वाढतं. अशावेळी डॉक्टर व्हिटॅमिन डीचं प्रमाण राखण्यासाठी सप्लिमेंट्स वापरण्यास सुरुवात करतात. जेणेकरून शरीरात व्हिटॅमिन डीचं प्रमाण टिकून राहतं.
advertisement
पण यापुढे, डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी सप्लिमेंट्स घेतलं तर ते विषारीपणा निर्माण करू शकतं. अतिरिक्त सेवनामुळे, मूत्रपिंडांना आणि यकृताला नुकसान होवू शकतं.
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जसा वाईट तसं शरीरात जीवनसत्वाचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त होणंही वाईटच. तज्ज्ञांच्या सल्ल्याचा विचार न करता, निर्धारित डोसपेक्षा जास्त औषध घेतल्यानं रक्तात कॅल्शियम जमा होऊ लागते, जे भविष्यात तुमच्यासाठी गंभीर ठरू शकतं.
advertisement
अतिरिक्त सेवनाचे परिणाम -
व्हिटॅमिन डीचं प्रमाण वाढल्यानं यकृत किंवा मूत्रपिंड निकामी होऊ शकतं.
मुख्य लक्षणं :-
पचनाच्या समस्या - पोट खराब होणं, उलट्या होणं, भूक न लागणं, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता.
मूत्रपिंड आणि यकृताचं नुकसान: मूत्रपिंड किंवा यकृताच्या समस्या जाणवतात. वारंवार लघवीला जावं लागणं, वारंवार तहान लागणं, यकृतालाही याचा धोका पोहचतो. काहींना यामुळे किडनी स्टोनचाही त्रास होऊ शकतो.
advertisement
हाडं आणि सांधे दुखणं: शरीराच्या सांध्यामध्ये वेदना जाणवू लागतात. हाडांमध्ये खूप वेदना होत असल्यासारखं वाटतं.
कोणतंही व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. अरुण एल. नाईक यांच्या मते, भारतातील लोक चाचणी न करता आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे शरीरात कॅल्शियमची पातळी धोकादायकपणे वाढते. यामुळे मूत्रपिंड, हृदय आणि हाडांना आणखी गंभीर नुकसान होऊ शकते. व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेणं सुरक्षित आहे आणि ते नेहमीच रक्त तपासणी आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाच्या आधारे घेतलं पाहिजे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 13, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamin D : व्हिटॅमिन डीचं अतिरिक्त सेवन ठरेल धोकादायक, शरीरावर होतील गंभीर परिणाम










