Yoga : स्क्रीन टाइम कमी करा, व्यायाम - आहाराकडे लक्ष द्या, बाबा रामदेवांचा फिटनेस मंत्रा

Last Updated:

तासन्तास कसरत आणि आहारात बदल केल्यानंतरही वजन कमी होत नसेल तर याचं कारण चुकीची जीवनशैली असल्याचं स्वामी रामदेव यांनी सांगितलं आहे. योग्य व्यायाम - योग्य आहार आणि सातत्य अशा टिप्स बाबा रामदेव यांनी दिल्या आहेत.

News18
News18
मुंबई : स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही जण व्यायाम करतात, काही जण चालतात. तर काही जण जिममधे जातात, योगासनं करतात आणि डाएटिंगकडे लक्ष देतात. पण, अनेकदा हे प्रयत्न करुनही वजन कमी होण्याऐवजी वाढत जातं.
व्यायाम करूनही वजन कमी होण्याऐवजी वाढत असेल तर बाबा रामदेव यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. तासन्तास कसरत आणि आहारात बदल केल्यानंतरही वजन कमी होत नसेल तर याचं कारण
चुकीची जीवनशैली असल्याचं स्वामी रामदेव यांनी सांगितलं आहे.
स्क्रीन टाइम कमी करा, दर तासाला हालचाल करा आणि दिवसाची सुरुवात योग आणि प्राणायामनं करा. तसंच काही योगासनं करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
advertisement
रामदेव यांच्या मते, काही सोप्या योगासनांमुळे पोटाची चरबी लवकर कमी होऊ शकते.
भुजंगासन: पोट आणि कंबरेवरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आसन
पवनमुक्तासन: गॅस, बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणापासून आराम मिळतो.
सूर्यनमस्कार: संपूर्ण शरीराला टोन येतो आणि कॅलरीज बर्न होतात.
advertisement
तसंच, कपालभाती आणि अनुलोम-विलोम प्राणायाम यामुळे चयापचयाचा वेग वाढतो आणि चरबी बर्न करण्याची प्रक्रिया वेगवान होते.
आहार साधा आणि निरोगी ठेवा.
नैसर्गिक आणि प्रक्रिया न केलेलं अन्न खाण्याचा सल्ला स्वामी रामदेव यांनी दिला आहे. सकाळी दलिया, पोहे, उपमा असा हलका आणि पौष्टिक नाश्ता करा. दुपारी डाळ, हिरव्या भाज्या, कोशिंबीर आणि थोडा सुकामेवा आणि रात्रीचं जेवण हलकं ठेवा. यासाठी त्यांनी सूप किंवा कोशिंबीर असे पर्याय दिले आहेत.
advertisement
आहार, व्यायामाबरोबरच ही दिनचर्या सातत्यपूर्ण ठेवणं गरजेचं आहे, नियमित दिनचर्या राखण्यानंच याचे परिणाम दिसून येतील. वजन कमी करण्याचा खरा मंत्र म्हणजे सातत्य. दररोज अर्धा तास ते एक तास योगा करा, संतुलित आहार घ्या आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. याशिवाय, दररोज आठ-दहा हजार पावलं चालण्याची आणि दररोज दोन ते तीन लीटर पाणी पिण्याची सवय लावा.
advertisement
दररोज योगा, प्राणायाम आणि निरोगी आहार अशी दिनचर्या ठेवली तर चार ते सहा आठवड्यांत वजनात फरक दिसून येईल याची हमी त्यांनी दिली आहे. यामुळे वजन दीर्घकाळ स्थिर राखण्यास मदत होते आणि शरीर आतून डिटॉक्स होण्यासाठीही मदत होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Yoga : स्क्रीन टाइम कमी करा, व्यायाम - आहाराकडे लक्ष द्या, बाबा रामदेवांचा फिटनेस मंत्रा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement