Cough : कफावर सुरक्षित आणि घरगुती उपचार, घशाची सूजही होईल कमी
- Published by:Renuka Joshi
 
Last Updated:
हवामान बदलादरम्यान घशात कफ जमा होणं, घसा दुखणं असा त्रास होऊ शकतो. खोकला, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यावर, लगेच आणि सुरक्षित आराम देण्यासाठी घरगुती उपचार उपयुक्त ठरतात.
मुंबई : पाऊस कमी झाला की हवेतला गारवा थोडा कमी होतो, दमटपणा जाणवायला सुरुवात होते. अनेकांना बदलत्या ऋतूत कफाचा त्रास होतो. पण यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर त्यामुळे खोकला, घसा खवखवणं आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. म्हणूनच, अशा हवेत काही त्वरीत आणि सुरक्षित घरगुती उपचारांची मदत होते. या उपायांमुळे कफ बाहेर काढण्याबरोबरच घशाला आराम मिळतो आणि सूज दूर होण्यासाठीही मदत होते.
आलं आणि मध : आल्यातले दाहक-विरोधी गुणधर्म घशाची जळजळ कमी करतात, तर मध घशातील कफ बाहेर येण्यास उपयुक्त ठरतो. एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध मिसळा आणि दिवसातून दोनदा घ्या.
advertisement
कोमट पाण्यानं गुळण्या : कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून गुळण्या केल्यानं घसा खवखवणं आणि कफ या दोन्हीपासून आराम मिळतो. कफ कमी करण्याचा आणि बॅक्टेरिया नष्ट करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
वाफ : गरम पाण्याच्या वाफेत पुदिना किंवा ओवा टाका आणि पाच मिनिटं श्वास घ्या. यामुळे घसा आणि नाकात साचलेला कफ वितळण्यास मदत होते आणि श्वास घेणं सोपं होतं.
advertisement
हळदीचं दूध: हळदीत जंतूनाशख आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. यामुळे घशाचा संसर्ग आणि खोकला कमी करण्यास मदत होते. कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या.
तुळस आणि आल्याचा चहा: तुळस आणि आलं दोन्ही घशासाठी औषध म्हणून काम करतात. तुळशीची पानं आणि आल्याचा चहा पिण्यानं कफ लवकर निघतो.
advertisement
लिंबू आणि कोमट पाणी : लिंबात असलेलं व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं आणि घशातील श्लेष्म काढून टाकण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात थोडे मध मिसळून लिंबाचा रस प्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 13, 2025 1:07 PM IST


