केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशात 1 जानेवारी 2025 पासून आतापर्यंत एकूण 5364 रुग्ण आढळले आहेत. तर 55 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 मेच्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांची संख्या 2700 होती. आता 6 जूनच्या आकडेवारीनुसार ही संख्या 5364 झाली आहे. याचा अर्थ गेल्या 5 महिन्यांत जितके कोरोना रुग्ण आढळले तितके रुग्ण फक्त 5 दिवसांतच आढळले आहेत.
advertisement
सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये पण सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात
सर्वाधिक 1679 रुग्ण केरळात आहेत. त्यापाठोपाठ गुजरात, पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. इथल्या रुग्णांची अनुक्रमे संख्या 615, 596, 592, 548 आहे.
सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये असले तरी सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात आहे. केरळमध्ये 11 तर महाराष्ट्रात 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 16 रुग्णांना इतर आजारांनीही ग्रासलं होतं.
देशात कोरोनाचे 4 नवीन व्हेरिएंट
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाचे LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 हे चार नवीन व्हेरिएंट आहेत. दक्षिण आणि पश्चिम भारतात पहिल्यांदा आढळले. मात्र मात्र नवे व्हेरियंट फार गंभीर नाहीत, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील,नवे व्हेरियंट अती धोकादायक नसल्याचा दिलाय निर्वाळा दिला आहे. त्यामुळे लोकांनी काळजी करू नये, असं आयसीएमआरने सांगितलं आहे. पण सावधगिरी बाळगण्याचं आवाहनही केलं आहे.