नवी दिल्ली : सुदृढ आरोग्यासाठी अॅक्टिव्ह लाइफस्टाइल आणि हेल्दी डायट अत्यंत आवश्यक असतं. आपण नेमकं कोणत्या वेळी जेवतो यालादेखील महत्त्व आहे. त्यामुळे अनेकजण 'इंटरमिटेंट फास्टिंग' करतात. एका ठराविक वेळेतच जेवायचं आणि इतर वेळी उपवास करायचा अशी ही पद्धत असते. वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सध्या इंटरमिटेंट फास्टिंग अत्यंत लोकप्रिय झालंय, परंतु ही पद्धत खरोखर आरोग्यासाठी फायदेशीर आहे का, याचे नेमके फायदे-नुकसान काय आहेत, जाणून घेऊया.
advertisement
इंटरमिटेंट फास्टिंग ही आहाराची एक विशिष्ट पद्धत आहे. यामध्ये जेवण आणि उपवास याचा एक क्रम फॉलो केला जातो. यात आपण दररोज काही ठराविक वेळांमध्ये खाऊ शकता. अशा प्रकारच्या उपवासाचे विविध प्रकार आहेत. जसं की, 16/8 पद्धत (दिवसभरात 16 तास उपवास करायचा आणि 8 तास जेवण करायचं), 5-2 पद्धत (आठवड्यातले 5 दिवस सामान्य आहार घ्यायचा आणि 2 दिवस कमी कॅलरी असलेले पदार्थ खायचे).
इंटरमिटेंट फास्टिंगचे फायदे :
- शरीरात कमी कॅलरी जातात, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
- मेटाबॉलिज्म वाढतं, ज्यामुळे फॅट बर्न होण्याची प्रक्रिया वेगानं होते.
- इन्सुलिन रेजिस्टंस कमी होण्यास मदत मिळते. ज्यामुळे टाइप-2 डायबिटीजचा धोका कमी होतो.
- शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत मिळते. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं.
- शरीरात ऑटोफॅजी नामक प्रक्रिया होते, ज्यामुळे सेल्स डॅमेज प्रोटिन आणि सेल्स तुटून शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते.
- मेंदूचं कार्य सुधारतं. तसंच मेंदूशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.
इंटरमिटेंट फास्टिंगमधून शरीराला विविध फायदे मिळतात. परंतु प्रत्येकवेळी हे फास्टिंग आरोग्यासाठी फायदेशीर ठरेलच असं नाही. जर आपण इंटरमिटेंट फास्टिंग सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसंच फास्टिंग दरम्यान परिपूर्ण आहार घ्यावा आणि दिवसभरात भरपूर पाणी प्यावं.