माठातलं पाणी लागेल फ्रिजपेक्षा भारी, जीव होईल थंडगार, पैसेही नाही जाणार, आजच करा जुगाड!

Last Updated:
Summer Tips : आता उन्हाळा बऱ्यापैकी जाणवायला सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये कुठूनही घरी आलं की, जरा थंड पाणी प्यायल्यावर जीव अगदी सुखावतो. परंतु सर्वांच्याच घरी फ्रिज असतंच असं नाही. मात्र काळजी करू नका घरात फ्रिज नसेल तरी आपण अगदी बर्फासारखं थंड पाणी पिऊ शकता. त्यासाठी नेमकी कोणती ट्रिक वापरायची जाणून घेऊया. (सिमरन जीत सिंह, प्रतिनिधी)
1/5
माठातलं पाणी हळूहळू थंड होतं. शिवाय हे पाणी आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. मातीतील अँटिबॅक्टेरियल गुणधर्म पाण्यात उतरतात, जे हानीकारक विषाणूंपासून आरोग्याचं रक्षण करतात. 

advertisement
2/5
माठातलं पाणी बराच वेळ थंड राहण्यासाठी आज आपण एक नामी युक्ती पाहणार आहोत. हे पाणी पिताच आपण फ्रिजचं पाणी विसरून जाल. 

3/5
एक स्वच्छ सूती कापड धुवून ते माठावर बांधावं. या कापडावर सतत पाणी ओतत राहावं. जेणेकरून कापड ओलं राहिल आणि त्यातून माठात सांडणारं पाणीही बराच वेळ थंड राहिल. 

4/5
माठाच्या अवतीभोवती वाळू ठेवावी. त्यात माठ रुतवावं. यामुळेदेखील माठातलं पाणी थंड राहू शकतं. हे पाणी इतकं थंड असेल की फ्रिजच्या पाण्याची आवश्यकता भासणार नाही. 

5/5
माठ खरेदी केल्यानंतर ते थेट वापरू नये. काही तासांसाठी ते पाण्यात बुडवून ठेवावं. मग पाण्यानं भरावं. यामुळे माठातलं पाणी छान थंडगार होईल. दरम्यान, माठ खरेदी करताना ते भक्कम आहे ना याची खात्री करून घ्यावी. त्यावर बोटांनी मारावं. त्यातून जेवढा जोरात आवाज येईल, तेवढं माठ भक्कम असेल. 

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement