अल्कोहोलच्या सेवनामुळे डिमेंशियाचा धोका वाढतो
ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रमुख संशोधक डॉ. अन्या टोपीवाला म्हणतात की, हलके किंवा मध्यम मद्यपान केल्यानेही डिमेंशियाचा धोका वाढू शकतो. कोणत्याही पातळीवर मद्यपान केल्याने मेंदूवर नकारात्मक परिणाम होतात. काही पूर्वीच्या संशोधनात असे सुचवण्यात आले होते की मद्यपान न करणाऱ्यांच्या तुलनेत हलके आणि मध्यम प्रमाणात मद्यपान केल्याने डिमेंशियाचा धोका कमी होऊ शकतो. तथापि, अनुवांशिक विश्लेषणावर आधारित नवीन अभ्यास हे पूर्णपणे नाकारतो. अभ्यास स्पष्टपणे दर्शवितो की जैविकदृष्ट्या किंवा अनुवांशिकदृष्ट्या, वाढलेले मद्य सेवन देखील डिमेंशियाचा धोका वाढवते, जरी अल्कोहोलचे सेवन मध्यम असले तरीही.
advertisement
मेंदूच्या पेशींचे नुकसान
अल्कोहोल थेट मेंदूच्या पेशींवर विषारी परिणाम करते. यामुळे पेशी मरतात आणि कालांतराने मेंदूचा आकार कमी होऊ लागतो.
दीर्घकाळ चालणारे नुकसान
दीर्घकाळ आणि जास्त प्रमाणात मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये, डिमेशिया होण्याचा धोका तीन पटीने वाढतो. यामुळे आयुष्यमान आणि जीवनशैलीवर गंभीर परिणाम होतो.
'सुरक्षित प्रमाण' एक भ्रम
नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, मेंदूच्या आरोग्यासाठी मद्यपानाची कोणतीही पातळी १०० टक्के सुरक्षित नाही. अगदी मध्यम प्रमाणात सेवन केल्यानेही मेंदूवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
शरीरातील पोषक घटकांचा अभाव
अल्कोहोलमुळे शरीरात व्हिटॅमिन B1 आणि पोषक घटकांचे शोषण कमी होते. व्हिटॅमिन बी१ च्या कमतरतेमुळे डिमेशिया आणि वेर्निके-कोर्साकॉफ सिंड्रोम सारख्या समस्या उद्भवू शकतात.
इतर आरोग्य धोके
मद्यपान उच्च रक्तदाब आणि हृदयविकार वाढवते. हे दोन्ही आजार डिमेशियाला चालना देणारे अप्रत्यक्ष घटक आहेत. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)