अंजीर शाकाहारी की मांसाहारी
अंजीर हे दक्षिण आणि पश्चिम आशिया आणि भूमध्य प्रदेशतलं एक महत्वाचं फळ आहे. अंजीर खाल्याने रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित राहते याशिवाय अंजीर हे हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. अंजीरांचे परागीभवन गांधीलमाशांमुळे होतं. मादी माशी अंजीराच्या फळामध्ये अंडी घालते. अंडी घातल्यानंतर नरमाशीही फळामध्ये प्रवेश करून मादी माशीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. अनेकदा मादी माशी बाहेर पडत नाही आणि अंजीराच्या आतमध्येच तिचा मृत्यू होतो. अंजीरमध्ये असलेले एन्झाईम्स मृत माशीच्या शरीराचे विघटन करतात आणि ते फळामध्ये मिसळतात. त्यामुळे हे फळ तयार होत असताना एका जीवाचा मृत्यू होतो. मात्र, प्रत्येक अंजारात या प्रक्रियेदरम्यान माशीचा आतमध्ये मृत्यू झाली किंवा ती बाहेर आली, हे कळण्यास मार्ग नसतो. त्यामुळे अनेकजण या फळाला मांसाहारी मानतात.
advertisement
म्हणून ‘हा’ समाज टाळतो अंजीर
जैन धर्मात अहिंसेला खूप महत्त्व दिले गेले आहे. हा धर्म तत्वज्ञान, अहिंसा, इतर मानवांना आणि प्राण्यांना इजा पोहोचवत नाही. त्यामुळे जैन समाजाचे लोक मांसाहारी पदार्थ खात नाहीत. तसेच जमीनीखाली येणारे रताळे, बटाचेही त्यांना वर्ज्य असते. अंजिरात मध्ये गांधील माशीचे काही घटक असतात त्यामुळे ते अंजीर खात नाहीत.
'हिवाळ्यात का आणि कसं वाढतं प्रदूषण? ; प्रदूषणापासून स्वत: चा बचाव कसा करणार?'