रक्तदाब नियंत्रणासाठी औषधांसोबतच जीवनशैली बदलणं खूप महत्वाचं आहे. या संदर्भात, एक खास जपानी युक्ती वापरुन बघता येईल. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, जपानी संशोधकांनी एक विशेष तंत्र विकसित केलं आहे. त्याला 'इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग' असं नाव देण्यात आलं आहे.
Fat Loss : अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खास टिप्स, शरीर होईल मजबूत
advertisement
इंटरवल वॉकिंग ट्रेनिंग - इंटरवल वॉकिंग ट्रेनिंग हे जपानी प्राध्यापक हिरोशी नोज आणि शिझुए मासुकी यांनी 2007 मधे विकसित केलं होतं. या तंत्रात, चालणं दोन भागात विभागलं गेलं आहे.
इंटरवल वॉकिंगची पद्धत -
जलद चालणं - तीन मिनिटं वेगानं चाला, जेणेकरून श्वासाची गती वाढेल आणि हृदयाचे ठोके वाढतील.
हळू चालणं - यानंतर, तीन मिनिटं हळू आणि आरामात चाला. हा पॅटर्न पाचवेळा करा. म्हणजे एकूण तीस मिनिटं चालणं ज्यात पंधरा मिनिटं वेगानं आणि पंधरा मिनिटं हळू चालणं असतं.
इंटरवल वॉकिंग ट्रेनिंगनं रक्तदाब कसा नियंत्रित होतो ?
इंटरवल वॉकिंग करताना शरीराच्या रक्तवाहिन्या सक्रिय होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो. इंटरवल वॉकिंग केल्यानं, सिस्टोलिक रक्तदाब सुमारे 9 मिमी एचजी आणि डायस्टोलिक रक्तदाब सुमारे 5 मिमी एचजीनं कमी होऊ शकतो. रक्तदाब वेळोवेळी वाढत असेल, तर दिनचर्येत ही चालण्याची युक्ती समाविष्ट करू शकता. या तंत्रामुळे शरीराची ऑक्सिजन घेण्याची क्षमता देखील वाढते, हे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.
इतर फायदे -
- रक्तदाब नियंत्रित करण्याव्यतिरिक्त यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते.
- यामुळे पायांना बळकटी मिळते, ज्यामुळे दैनंदिन कामं चांगल्या प्रकारे करण्यास मदत होते.
Periods : रक्ताच्या गुठळ्या कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स, या उपायानं होईल दीर्घकाळ फायदा
- यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते, ज्यामुळे ते टाइप-2 मधुमेह असलेल्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरतं.
या सर्वांव्यतिरिक्त, दररोज थोडा वेळ चालल्यानं मूड चांगला राहतो, झोप गाढ लागते आणि ताणतणावही कमी होतात. कुठल्याही प्रकारे तब्येतीशी संदर्भात आहार किंवा व्यायाम करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
