Periods : रक्ताच्या गुठळ्या कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स, या उपायानं होईल दीर्घकाळ फायदा

Last Updated:

काही महिलांना मासिक पाळीच्या काळात अनेक बदल आणि समस्यांना तोंड द्यावं लागतं. यातील एक सामान्य समस्या म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होणं. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव आणि गुठळ्या कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपायांची मदत होऊ शकते.

News18
News18
मुंबई: स्रियांना मासिक पाळीदरम्यान काही वेळा खूप दुखतं, खूप रक्तस्त्राव होतो. तर काहीवेळा हे प्रमाण कमी जास्त होतं. प्रत्येक स्त्रीला होणाऱ्या त्रासाचं स्वरुप वेगळं असतं. काही महिलांना मासिक पाळीच्या काळात अनेक बदल आणि समस्यांना तोंड द्यावं लागतं. यातील एक सामान्य समस्या म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होणं.
दर महिन्याला, पाळीदरम्यान असं अनेकदा घडतं. पण जर गुठळ्यांचं प्रमाण आणि आकार नाण्याच्या आकारापेक्षाही मोठा असेल आणि वारंवार गुठळ्या येत असतील, तर सावध व्हा कारण याचा अर्थ शरीराला अतिरिक्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
advertisement
यासाठी काही आयुर्वेदिक उपायांची मदत होईल. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव आणि गुठळ्या कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय प्रभावी ठरु शकतात. यासाठी अशोकाच्या झाडाचं साल दोन इंच, एक इंच ज्येष्ठमधाचा तुकडा आणि दोनशे मिली पाणी हे साहित्य लागेल.
अशोकाच्या झाडाचं साल आणि ज्येष्ठमधाचा तुकडा पाण्यात घालून चांगलं उकळून घ्या. पाणी अर्ध होईपर्यंत उकळा. गाळून सकाळी रिकाम्या पोटी प्या.
advertisement
आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, या पाण्यानं हार्मोन्स संतुलित राहतात आणि रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी याची मदत होते. मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांपासूनही यामुळे काही प्रमाणात आराम मिळतो.
या गोष्टी लक्षात ठेवा -
रक्ताच्या गुठळ्या खूप जास्त असतील आणि चक्कर येत असेल किंवा खूप अशक्तपणा येत असेल, तर आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. काही वेळा, शरीरात लोहाची कमतरता, गर्भाशयातील फायब्रॉइड्स किंवा थायरॉईडच्या समस्यांमुळे असा त्रास होऊ शकतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Periods : रक्ताच्या गुठळ्या कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स, या उपायानं होईल दीर्घकाळ फायदा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement