Oral Care : निरोगी दातांंचं रहस्य, मौखिक आरोग्यासाठी खास टिप्स, नक्की वापरुन पाहा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
निरोगी दातांचं रहस्य म्हणजे योग्य स्वच्छता राखणं. मौखिक आरोग्यात दात, हिरड्यांची किड, सूज, दुखणं याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. वेळीच उपचार केले नाहीत तर दात किडण्याचं प्रमाण आणि वेदना वाढू शकतात. ही समस्या टाळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेले नैसर्गिक आणि घरगुती उपाय आजही प्रभावी आहेत.
मुंबई : दात किडल्यामुळे दुखतं तेव्हा खूप वेदनाशमक औषधं घेतली जातात. पण खाण्याच्या वाईट सवयी, गोड पदार्थांचं अति सेवन आणि योग्य प्रकारे तोंडाची स्वच्छता न केल्यामुळे हा त्रास होतो. त्यामुळे आधी सवयी सुधारल्या की दातांचं नुकसान कमी होईल.
निरोगी दातांचं रहस्य म्हणजे योग्य स्वच्छता राखणं. मौखिक आरोग्यात दात, हिरड्यांची किड, सूज, दुखणं याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. वेळीच उपचार केले नाहीत तर दात किडण्याचं प्रमाण आणि वेदना वाढू शकतात.
ही समस्या टाळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेले नैसर्गिक आणि घरगुती उपाय आजही प्रभावी आहेत.
1. लवंगांचा वापर
advertisement
लवंगांमधे दाहक-विरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म असतात, जे दातदुखी आणि पोकळी कमी करण्यास मदत करतात. लवंग हळूहळू चावा किंवा पोकळीच्या ठिकाणी लवंगाचे तेल लावा. 2-3 लवंगा बारीक करा, ऑलिव्ह ऑइलमधे मिसळून पेस्ट बनवा आणि दात किडलेल्या भागावर लावा.
advertisement
2. हळद आणि मोहरीचं तेल
हळदीत जंतुनाशक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, तर मोहरीच्या तेलानं दात मजबूत होतात. अर्धा चमचा हळदीत काही थेंब मोहरीचं तेल आणि चिमूटभर मीठ मिसळून पेस्ट बनवा. दात आणि हिरड्यांवर हलका मसाज करा आणि पाच-दहा मिनिटांनी धुवा.
3. मीठाचं पाणी
advertisement
मीठाचं पाणी हे नैसर्गिक जंतुनाशक म्हणून काम करतं आणि तोंडातील जीवाणू नष्ट करण्यास यामुळे मदत होते. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा. दिवसातून दोन-तीन वेळा या पाण्यानं स्वच्छ धुवा. यामुळे किडीमुळे होणारी वेदना आणि सूज कमी होईल.
advertisement
4. कडुनिंबाच्या काड्या
कडुनिंबात नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, यामुळे दात किडण्यापासून प्रतिबंध होतो आणि दात मजबूत करण्यास मदत होते. कडुनिंबाची एक ताजी डहाळी घ्या आणि त्याचं एक टोक ब्रशसारखं चावा. यानं दात हलक्या हातानं घासा. यामुळे दातांत किड लागण्याची क्षमता कमी होईल आणि हिरड्या निरोगी राहतील.
advertisement
5. लसूण पेस्ट
लसणामधे अॅलिसिन नावाचं एंझाइम असतं, ज्यात शक्तिशाली अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. लसूणची एक पाकळी बारीक करा आणि त्यात थोडंसं खडे मीठ घाला. ही पेस्ट किडीच्या भागावर लावा आणि काही मिनिटांनी धुवा.
दाताची किड रोखण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. लवंग, हळद, कडुनिंब, मीठ आणि लसूण यासारखे पारंपरिक उपाय दात मजबूत करण्यासाठी आणि जीवाणू नष्ट करण्यासाठी मदत करतात. पण दात किडण्याची समस्या गंभीर असेल तर दंतवैद्याचा सल्ला घेणं महत्वाचं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 15, 2025 5:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Oral Care : निरोगी दातांंचं रहस्य, मौखिक आरोग्यासाठी खास टिप्स, नक्की वापरुन पाहा


