Constipation : पोटाच्या समस्यांवर रामबाण औषध, बद्धकोष्ठतेची समस्याही होईल दूर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, दुधाचा उपयोग तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकतो. दूध आणि तूप हे मिश्रण यासाठी फायदेशीर आहे. तसंच, गरम लिंबू पाणी, दही, जवस बिया, एरंडेल तेलाच्या वापरानं पोटाच्या समस्या कमी होऊ शकतात.
मुंबई : बद्धकोष्ठतेची समस्या अनेकांना जाणवते. बद्धकोष्ठता झाली तर मल कठीण होतो आणि पोट साफ होत नाही. जास्त जोरानं शौचास जाण्याचा प्रयत्न केला तर मूळव्याधासारख्या गंभीर समस्या होण्याची शक्यता वाढते.
तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, दुधाचा उपयोग तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकतो. दूध आणि तूप हे मिश्रण यासाठी फायदेशीर आहे. यासाठी एक कप गरम दुधात एक चमचा तूप घाला. रात्री हे दूध प्यावं.
हे दूध सौम्य रेचक म्हणून काम करतं आणि मल मऊ करतं ज्यामुळे मलविसर्जनात कोणतीही समस्या येत नाही आणि पोट सहज स्वच्छ होतं.
advertisement
गरम लिंबू पाणी -
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळविण्यासाठी गरम लिंबू पाणी देखील पिऊ शकता. एक ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस घाला आणि ते प्या. हे पाणी पिण्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. ते शरीराला हायड्रेट देखील करतं.
advertisement
जवसाच्या बिया दह्यात मिसळून खा-
एक वाटी दही घ्या आणि त्यात जवसाच्या बिया घाला. दही आणि जवसाच्या बिया नैसर्गिक रेचक म्हणून काम करतात आणि जवसाच्या बियांत असलेल्या फायबरमुळे शौच करणं सोपं होतं.
दररोज नाही तर अधूनमधून एरंडेल तेल पिऊ शकता. हे तेल रेचक म्हणून काम करतं. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी एरंडेल तेल पिणं हा चांगला पर्याय आहे. पण हे तेल वारंवार पिऊ नका, अन्यथा ते पोटाच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणू शकतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 15, 2025 11:56 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Constipation : पोटाच्या समस्यांवर रामबाण औषध, बद्धकोष्ठतेची समस्याही होईल दूर


