advertisement

Dizziness : पुढे धोका आहे....चक्कर येत असेल तर वेळीच व्हा सावध, लक्षणं आणि कारणांची सविस्तर माहिती

Last Updated:

तीव्र चक्कर येणं म्हणजे केवळ अस्थिर वाटणं असं नाही तर ते आपल्या शरीरातील एखाद्या समस्येचं लक्षण देखील असू शकतं. कधीकधी चक्कर येण्याची लक्षणं इतकी सौम्य असतात की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. सुरुवातीची लक्षणं समजून घेतली आणि वेळीच योग्य पावलं उचलली तर मोठे आजार टाळता येतात.

News18
News18
मुंबई : कधी खूप दमल्यामुळे, खाल्लं प्यायलं नसल्यानं चक्कर येण्याची शक्यता असते. पण जेव्हा ही चक्कर तीव्र होते आणि वारंवार येऊ लागते तेव्हा ती एक गंभीर समस्या बनू शकते. तीव्र चक्कर येणं म्हणजे केवळ अस्थिर वाटणं असं नाही तर ते आपल्या शरीरातील एखाद्या समस्येचं लक्षण देखील असू शकतं. कधीकधी चक्कर येण्याची लक्षणं इतकी सौम्य असतात की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. सुरुवातीची लक्षणं समजून घेतली आणि वेळीच योग्य पावलं उचलली तर मोठे आजार टाळता येतात.
advertisement
तीव्र चक्कर येण्याआधी, शरीरात काही बदल होतात, जे ओळखणं महत्त्वाचं आहे. चक्कर येणं किंवा डोकं हलकं होणं, अशक्तपणा आणि थकवा जाणवणं, डोक्यात जडपणा किंवा दाब जाणवणं, उलट्या किंवा मळमळ झाल्यासारखं वाटणं, धूसर दृष्टी किंवा काळोखी येणं, हृदयाचे ठोके जलद किंवा असामान्य होणं, ऐकण्याची क्षमता कमी होणं किंवा कानात आवाज येणं. ही लक्षणं दिसली तर शरीर तुम्हाला संभाव्य धोक्याची चिन्हं सांगत आहे हे नक्की.
advertisement
तीव्र चक्कर येण्याची मुख्य कारणं  - रक्तदाबात चढ उतार, पाण्याची कमतरता, रक्तातील साखर कमी होणं (हायपोग्लायसेमिया), अनुवांशिक किंवा न्यूरोलॉजिकल समस्या, कानाची समस्या, तणाव किंवा चिंता, निद्रानाश किंवा झोपेचा अभाव, औषधांचे दुष्परिणाम. योग्य उपचार करण्यासाठी ही कारणं समजून घेणं महत्वाचं आहे.
advertisement
चक्कर येते आहे कळल्यावर पडण्याचा धोका कमी करण्यासाठी बसा किंवा झोपा. हळूहळू श्वास घ्या आणि आराम करा. पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट पेय प्या. चक्कर कमी होईपर्यंत हालचाल टाळा. मळमळ होत असेल तर हलकं अन्न खा आणि विश्रांती घ्या.
चक्कर येऊ नये म्हणून घरगुती आणि खबरदारीचे उपाय -
advertisement
दररोज पुरेसं पाणी प्या.
फळं, भाज्या आणि प्रथिनांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या.
नियमित व्यायाम करा आणि तणाव नियंत्रित करा.
दीर्घकाळ उभं राहणं टाळा.
पुरेशी झोप घ्या आणि शरीराला विश्रांती द्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dizziness : पुढे धोका आहे....चक्कर येत असेल तर वेळीच व्हा सावध, लक्षणं आणि कारणांची सविस्तर माहिती
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement