कल्याणीने बी.कॉम मध्ये शिक्षण पूर्ण करून काही वर्ष नाशिकमध्ये जॉब केला. परंतु आपण काही नवीन करावे ज्याने आपल्या परिवारात आपली ओळख वेगळी निर्माण होईल या करता तिने नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. अभ्यास करण्यासाठी नोकरी सोडल्याने आर्थिक अडचणी भासू लागल्या. त्यात घराचीही परिस्थिती बेताची असल्याने सारखे सारखे घरून पैसे घेणे चांगले वाटत नसल्याने आपण असे काही करावे की ज्याने आपला अभ्यासही होईल आणि आपल्याला दोन पैसे सुद्धा मिळतील या विचाराने कल्याणी हिने सोशल मीडियावर पाहिलेला फ्रेश फ्रुट्स कटिंग व्यवसाय नाशिकमध्ये सुरू करावा असे ठरविले.
advertisement
Snake Care: चंदन नाही शेतात अशा झाडांवर सापांची ठिय्या? शेतकऱ्यांनो, घ्या काळजी! Video
यानंतर घरी ही बाब सांगितल्यानंतर घरातील मंडळींनी देखील पुढाकार घेऊन मदत करण्याची इच्छा कल्याणीला दाखविली. आज कल्याणी तिच्या आई, आजी, मामी आणि तिच्या भावासोबत मिळून हा व्यवसाय करत असते. रोज बाजारातून नवीन ताजे फळे आणून त्यांना कापून एका फ्रूट्स बॉक्समध्ये भरून विक्री करत असते.
90 रुपयाला एक प्लेट ती ही घरी बसल्या बसल्या विविध फळ खात येतात या करता नाशिककर देखील कल्याणीच्या या नवीन व्यवसायाला चांगला प्रतिसाद देत आहेत. नाशिकमध्ये तुम्हाला हिचे फ्रेश फ्रूट्स घरी किंवा ऑफिस मध्ये ऑर्डर करायची असल्यास तिच्या इंस्टाग्राम पेज @_AAROGYACHI_TOPLI या वरून अधिक माहिती घेऊन तुम्हीही ऑर्डर करू शकता.