TRENDING:

Kas Pathar : फुलांचे राज्य कास पठारला कसं पोहोचाचं? Entry Fee, राहण्याची सोय, एकूण खर्च आणि खास टीप; A to Z माहिती

Last Updated:

kas pathar traveling guide : आज आम्ही तुम्हाला कास पठारच्या ट्रॅव्हल गाईड देणार आहोत, जेणे करुन तुम्ही सोलो, कुटुंब किंवा मग फ्रेंड्स सोबत इथे जाण्याचा प्लान करु शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रवास हा केवळ ठिकाणे पाहण्याचा अनुभव नसतो तर तो निसर्ग, संस्कृती आणि माणसांशी जोडणारा दुवा असतो. प्रत्येक ठिकाणाची स्वतःची खासियत असते. कधी ऐतिहासिक किल्ले, कधी निसर्गरम्य धबधबे, तर कधी फुलांनी बहरलेली मैदाने. पण अशा प्रवासात थोडं नियोजन महत्त्वाचं ठरतं, यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात, शिवाय महत्वाची ठिकाणं मिस होत नाहीत. कसं जायचं, कुठे थांबायचं, किती खर्च होईल आणि जवळपासची ठिकाणे कोणती आहेत, याची माहिती असली की प्रवास अधिक आनंददायी ठरतो. (Kaas plateau)
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

आज आम्ही तुम्हाला कास पठारच्या ट्रॅव्हल गाईड (kas pathar traveling guide) देणार आहोत, जेणे करुन तुम्ही सोलो, कुटुंब किंवा मग फ्रेंड्स सोबत इथे जाण्याचा प्लान करु शकता.

जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात रंगीबेरंगी फुलांचे गालिचे अनुभवायचे असतील, तर कास पठार (कास पठार फुलांचे मैदान) नक्की गाठा. युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेल्या या पठारावर दरवर्षी ऑगस्ट अखेर ते ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत फुलांचा मोहक बहर पाहायला मिळतो. या काळात देशभरातून पर्यटक, छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी येथे भेट देतात.

advertisement

लोकेशन

सातारा शहराजवळ, महाराष्ट्रात वसलेलं हे ठिकाण आहे.

साताऱ्यापासून सुमारे २५ किमी, पुण्यापासून १४० किमी, आणि मुंबईपासून २८० किमी अंतरावर हे ठिकाण आहे.

सुमारे 12,000 मीटर उंचीवर, थंडावा आणि सुंदर निसर्गरम्य दृश्ये देणारं हे ठिकाण.

का भेट द्यावी?

फुलांचा बहर: 850 हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती, ज्यामध्ये ऑर्किड्स, करवी आणि दुर्मीळ स्थानिक फुले आहेत.

advertisement

जांभळी, गुलाबी, पिवळी फुले फुललेली गवताळ मैदानात फोटो काढण्याची मजाच काही और आहे. हे ठिकाणी तुम्हाला भारताबाहेर आल्याचं फील देईल.

जवळची आकर्षणे: तलाव, धबधबे आणि ऐतिहासिक किल्ले.

कसे जायचे?

रेल्वेने

जवळचा रेल्वे स्थानक: सातारा (25 किमी)

इथे पोहोचण्यासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूरहून रेल्वे सुविधा उपलब्ध आहे. साताऱ्याहून रिक्षा, कॅब किंवा बसने पठारावर जाता येते.

advertisement

रस्त्याने

पुणे ते कास: 3 ते 3.5 तास, NH48 मार्गे.

मुंबई ते कास: 6 ते 7 तास, NH48 मार्गे.

राहण्याची सोय

तुम्हाला जर तिथे रहाण्याची इच्छा असेल तर तुम्ही तिथे राहू ही शकता. पण तुम्हाला साताऱ्याला मुक्काम कराला काही बजेट आणि काही मिडरेंज हॉटेल्स मिळतील बजेट हॉटेलसाठी प्रति रात्र ₹800 – ₹1,500 खर्च येईल तर, मिड-रेंज रिसॉर्ट्स 2,000-3,500 पर्यंत कासजवळ मिळतील. घरगुती जेवणासह होमस्टेचा पर्याय आहे जो 1,000-2,000 रुपयात मिळेल.

advertisement

(पठारावर थेट मुक्काम करता येत नाही. सातारा किंवा जवळच्या गावात मुक्कामाची सोय आहे.)

प्रवेश आणि वेळ (kas pathar entery fee)

हे ठिकाण भेट देण्यासाठी तुम्हाला काही प्रवेश शुल्क द्यावे लागेल तसेच वेळ देखील पाळावी लागेल.

प्रवेश शुल्क: ₹100 प्रति व्यक्ती (3 तास वैध).

बुकिंग: सप्टेंबर–ऑक्टोबर हंगामात ऑनलाइन करणे आवश्यक. (kas pathar tickets online)

वेळा: सकाळी 7.00 ते संध्याकाळी 6.00

जवळपासची फिरण्यासारखी ठिकाणं (place to visit near kas pathar)

-कास तलाव (2 किमी) – शांत तलाव, बोटिंगची सोय.

-ठोसेघर धबधबा (25 किमी) – पावसाळ्यात अद्भुत.

-सज्जनगड किल्ला (18 किमी) – ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाचे.

-अजिंक्यतारा किल्ला (25 किमी) – साताऱ्याचे विहंगम दृश्य.

-बामणोली (20 किमी) – शिवारसागर तलावावरील बोटिंग.

-महाबळेश्वर (70 किमी) – प्रसिद्ध हिल स्टेशन.

अंदाजे खर्च (प्रति व्यक्ती – 2 दिवस, पुणे/मुंबईहून)

प्रवास: 600 -1500 रुपये (बस/रेल्वे/शेअर्ड कॅब).

राहणे: 1,000-2,500 रुपये

खाणे: 500-1,000 रुपये

प्रवेश आणि लोकल प्रवास: ₹300-800 रुपये

त्यामुळे तुमचा एकूण अंदाजे खर्च: 2,500-5,500 रुपयात होऊ शकतो.

प्रवास टिप्स

योग्य काळ: सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत.

प्रवेश तिकीट आगाऊ ऑनलाइन घ्यावे.

पाणी, हलके खाणे आणि छत्री/रेनकोट सोबत ठेवा.

फुले तोडू नयेत; निसर्ग संवर्धन नियम पाळावेत.

पठारावर चालण्यासाठी आरामदायी बूट वापरावेत.

कास पठार हे केवळ पर्यटन स्थळ नसून एक नैसर्गिक चमत्कार आहे. येथे केलेली वीकेंड ट्रिप परवडणारी, मनमोहक आणि निसर्गप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kas Pathar : फुलांचे राज्य कास पठारला कसं पोहोचाचं? Entry Fee, राहण्याची सोय, एकूण खर्च आणि खास टीप; A to Z माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल