‘हे’ पदार्थ धोक्याचे
असं नाहीये की प्युरिन हे फक्त शरीरातचं तयार होतं. प्युरिन हे अनेक खाद्यपदार्थांमध्येही आढळून येतं. त्यामुळे अनेकदा प्युरिनयुक्त पदार्थ खाल्ल्याने युरिक ॲसिडचं प्रमाण वाढून सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो. जंक फूड, चुकीच्या वेळी जेवणं, मद्यपान करणं, साखरयुक्त पेये अशा गोष्टींमुळे देखील प्युरिनचं प्रमाण वाढतं. तुम्हालाही युरिक ॲसिडचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय आणि घरगुती ड्रिंक्सची माहिती आम्ही तुम्हाला देतो आहोत, जेणेकरून तुम्ही युरिक ॲसिडच्या त्रासापासून तुमची सुटका करून घेऊ शकता.
advertisement
युरिक अॅसिडवर परिणामकारक घरगुती उपाय
गुळवेलीचा चहा : गुळवेलीत असलेले काही गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करून शरीराला विषमुक्त करतात. शरीरातले टाकाऊ घटक लघवीद्वारे शरीराबाहेर काढून टाकले जातात. ज्यांच्या शरीरात युरिक अॅसिडचं प्रमाण मर्यादेबाहेर आहे त्यांच्यासाठी गुळवेलीचा चहा फायद्याचा ठरतो. गुळवेलीमुळे युरिक अॅसिडचं प्रमाण तर नियंत्रित होईलच मात्र त्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढायला मदत होईल.
गुळवेलीचा चहा कसा करावा ?
गुळवेलीचा चहा बनवणं अगदी सोपं आहे. गुळवेलीचं देठ किंवा बाजारात मिळणारी गुळवेलीची पावडर एक कप पाण्यात उकळवा. साधारण पणे 5 मिनिटं उकळल्यानंतर हा काढा किंवा चहा गाळून प्या.
त्रिफळा चहा : त्रिफळा हा आवळा, हरिताकी आणि बिभीताकीपासून बनवला जातो. जो शरीराला नैसर्गिकरित्या स्वच्छ करते. त्रिफळ्याच्या सेवनानमुळे पचनक्रिया सुधारते. पचन सुधारल्यामुळे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे मूत्रपिंड आणि यकृताच्या कार्याही सुरळीत चालतं. यामुळे शरीरातलं युरिक अॅसिडचं प्रमाण आपोआपच नियंत्रणात राहतं.
त्रिफळा चहा कसा करावा ?
त्रिफळा चहा बनवण्यासाठी, एक कप पाण्यात एक चमचा त्रिफळा पावडर घाला आणि तीन ते चार मिनिटे उकळू द्या. तयार झालेला चहा गाळून प्या.
धण्याचं पाणी : धण्याचं पाणी हे युरिक अॅसिडच्या त्रासावर रामबाण उपाय आहे. तुमच्या शरीरातल्या युरिक अॅसिडचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही अधूनमधून धण्याचं पिऊ शकता. धणे हे थंड प्रकृतीचे असल्याने शरीरातली उष्णता कमी होऊन शरीर आतून थंड राहायला मदत होते. धण्याचं पाणी प्यायल्याने शरीराचं नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफिकेशन होतं. मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी आणि रक्तातलं अतिरिक्त युरिक अॅसिड काढून टाकण्यासाठी धण्याचं पाणी फायद्याचं आहे.
धणे रात्रभर भिजवा
एका ग्लास पाण्यात एक चमचा धणे घालून ते रात्रभर भिजू द्या. सकाळी उपाशी पोटी हे पाणी गाळून प्या.