Uric Acid Home Remedies: हिवाळ्यात होतोय युरिक ॲसिडचा त्रास? 10 रूपयात घरगुती उपायांनी दूर करा युरिक ॲसिडचा त्रास

Last Updated:
Home Remedies for Uric Acid in Marathi: युरिक ॲसिड हा शरीरात एक टाकाऊ पदार्थ असतो, जो प्युरीन नावाच्या रसायनाच्या विघटनाने तयार होतो. पण जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा हा टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकला जात नाही. त्यामुळे सांध्याभोवती क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागतो. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. तुम्हालाही युरिक ॲसिडचा त्रास असेल तर त्यावर महागड्या औषधोपचारांची गरज नाहीये. अवघ्या 10 रूपयात घरगुती उपायांनी युरिक ॲसिडटचा त्रास दूर करता येऊ शकतो.
1/7
युरिक ॲसिड वाढल्यामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे येतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन विविध आजारांचा धोका उद्भवतो. त्यामुळे हिवाळ्यात युरिक ॲसिडच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं.

advertisement
2/7
आवळ्या व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. याशिवाय आवळ्याच्या दाहकविरोधी गुणधर्मांमुळे युरिक ॲसिड नियंत्रणात राहून सांधेदुखीपासून आराम मिळतो.

3/7
युरिक ॲसिडच्या त्रासावर कच्चे धणे खाणं किंवा धणे भिजवलेलं पाणी पिणं हे फार फायद्याचं ठरतं. धण्यामुळे किडनीचं कार्य सुधारून वाईट पदार्थ शरीराबाहेर फेकायला मदत होते. धणे खाल्ल्यामुळे सांध्या भोवती जमा झालेलं युरिक ॲसिड लघवीद्वारे शरीराबाहेर फेकलं जातं. त्यामुळे युरिक ॲसिडचा त्रास कमी होतो.

4/7
शरीरात जमलेलं युरिक ॲसिड बाहेर काढून टाकण्यात कडुनिंब फायद्याचं ठरतं. कडुनिंबात असलेल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे सूज आणि सांधेदुखीचा त्रास कमी व्हायला मदत होते. याशिवाय शरीराच्या अंतर्गत शुद्धीसाठी म्हणजेच डिटॉक्सिफिकेशनसाठीही कडुलिंब फायद्याचं ठरतं.

5/7
आर्युवेदामध्ये गुळवेलीच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुळवेलीची पानं खाल्ल्यामुळे किंवा त्या पानांचा रस प्यायल्यामुळे किडनीचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे आपसूकच युरिक ॲसिडसह शरीरातले इतरही वाईट घटक शरीराबाहेर काढून टाकायला मदत होते. त्यामुळे युरिक ॲसिडचा त्रास कमी होतो.

6/7
शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेत आणि पचनात हरड महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यामुळे युरिक ॲसिडसह अन्य टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात आणि शरीरातलं युरिक ॲसिडचं प्रमाण नियंत्रणात राहतं.

7/7
सकाळी सकाळी एक ग्लास हळदीच्या पाण्यात लिंबू पिळून ते पाणी उपाशी पोटी प्यायल्यास युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवता येते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे सूज कमी करून युरिक ॲसिडच्या वेदनांपासून आराम देतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement