रायपूर : अनेकजणांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. सकाळचा चहा म्हणजे काहीजणांसाठी जीव की प्राण असतो, तो जर मिळाला नाही, तर दिवसभर त्यांना काही सुचेनासं होतं. तर काहीजणांना दिवसभरातून कधीही सुचेनासं झालं की ते चहा पितात. चहाचे वेगवेगळे प्रकार असतात, कोरा चहा, दुधाळ चहा, मसाला चहा, गवती चहा, इत्यादी. तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीये का, प्रत्येक घरातल्या चहाची चव वेगवेगळी असते. इतकंच काय, घरातल्या प्रत्येकाच्या हातच्या चहाची चवही वेगळी असते. त्याचं कारण म्हणजे चहामध्ये मिसळल्या जाणाऱ्या पदार्थांचं प्रमाण.
advertisement
ग्रीन नाही, Blue tea प्यायलाय? पिरियड्सपासून डोकेदुखीवर रामबाण, वजनही करतो कमी
चहाला अनेकजण ऊर्जास्रोत मानतात. कारण एक कप चहामुळे काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. सगळा आळस दूर होतो. काहीजणांना कमी साखरेचा चहा आवडतो. परंतु जवळपास सर्वांनाच कडक असा वाफाळता चहा हवा असतो. त्यामुळे आज आपण चहाची परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत.
वरण-भातावर तूप कसलं खाताय, उपाशीपोटी खाऊन बघा! जास्त फायदे मिळतील
टपरीवर जसा चहा मिळतो तसा स्वादिष्ट चहा बनवण्यासाठी पाणी कमी, दूध जास्त, साखर, चहापावडर आणि आलं घ्यावं. सर्वात आधी पातेल्यात दूध घ्यायचं, मग चहापावडर आणि साखर घालून शेवटी पाणी ओतून आलं घालावं. या मिश्रणाला उकळी आली की, एक अतिशय स्वादिष्ट असा चहा बनून तयार होईल.
थंडीत अनेकजणांना आल्याचा चहा आवडतो. आरोग्याच्या दृष्टीने तो चांगला असतो. तर, उन्हाळ्यात लोक जास्तीत जास्त वेलचीचा चहा पितात. आल्याचा असो किंवा वेलचीचा चहा असो. हे पदार्थ चहामध्ये शेवटी घालायचे ज्यामुळे त्यांची चव जशीच्या तशी उतरते.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा