कांद्यामध्ये लिंबू घालून सॅलाडप्रमाणं खाल्ल्यास त्याचे अनेक फायदे होतात. समग्र जीवनशैलीचे शिक्षक (होलिस्टिक लाइफस्टाइल कोच) ल्यूक कौटिन्हो यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर कच्चा कांदा-लिंबू मिसळून खाण्याचे अनेक फायदे शेअर केले आहेत. त्यांनी लोकांना सल्ला दिलाय की, जेवण्यापूर्वी त्याचं सेवन केल्यास ते अनेक प्रकारे उपयुक्त ठरतं.
या छोट्या छोट्या चांगल्या सवयी टाळतील अचानक येणारे हार्ट अटॅक! आजपासूनच करा अवलंब
advertisement
कांदा आणि लिंबाचे फायदे
इंस्टाग्रामवर एक छोटा व्हिडिओ शेअर करताना कौटिन्हो म्हणाले की, जेवण्यापूर्वी कांद्यामध्ये लिंबाचा रस घालून खाणं हे उत्तम स्टार्टर आहे. कांदा पचनक्रिया वाढवतो. अभ्यासानुसार, कांद्यामध्ये प्रीबायोटिक इन्युलिन आणि फ्रुक्टोलिगोसेकराइड (inulin and fructooligosaccharides) असतात, जे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात. त्यामुळं रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित काम करते. कांदा अनेक प्रकारे खाल्ला जाऊ शकतो. कोशिंबीर, चटणी, चाट, भाजीची ग्रेव्ही या रूपात तो खाता येतो. कांद्यामध्ये टोमॅटो मिसळून कोशिंबीर बनवल्यास स्वाद आणखी छान लागतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचं संयुग असतं, जे कांद्यासह अन्न शोषण्यास मदत करतं.
या लोकांनी कच्चा कांदा खाऊ नये
कांदा प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. ज्यांना अॅसिडिटीची समस्या आहे किंवा पोट फुगण्याची समस्या आहे किंवा ज्यांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम (Irritable Bowel Syndrome) आहे, त्यांनी कांदा खाऊ नये. यामुळं समस्या आणखी वाढू शकतात.