Good Habits : या छोट्या छोट्या चांगल्या सवयी टाळतील अचानक येणारे हार्ट अटॅक! आजपासूनच करा अवलंब
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
आपल्या शरीरात अनेक प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात. हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे पण जर त्याचा अतिरेक झाला तर तो आपल्या जीवाचाही शत्रू बनतो. वाईट कोलेस्टेरॉल हृदयासाठी सर्वात वाईट आहे, ट्रायग्लिसराइड्स देखील कमी धोकादायक नाहीत. ट्रायग्लिसराइड्स वाढल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो, मात्र खराब कोलेस्टेरॉलसोबत ते वाढल्यास ही बाब अधिक धोकादायक बनते.
मेयो क्लिनिकच्या मते, रक्तातील ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण जास्त असल्याने रक्तवाहिन्या कडक होतात. याला आर्टिओस्क्लेरोसिस म्हणतात. जेव्हा धमन्या कडक आणि पातळ होऊ लागतात तेव्हा त्या फुटण्याची भीती असते आणि रक्त गोठण्याची भीती असते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ट्रायग्लिसराइड्सची सामान्य श्रेणी 150 मिलीग्राम प्रति डेसीलिटर किंवा 1.7 मिलीमोल्स प्रति लिटर असावी. यापेक्षा ते अधिक हानिकारक आहे.
advertisement
अस्वास्थ्यकर गोष्टींपासून दूर राहा : ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी अस्वास्थ्यकर गोष्टी टाळाव्या लागतात. प्रक्रिया केलेले अन्न, गोड पेये, कॉर्न सिरप, प्राणीजन्य पदार्थ असलेले पदार्थ, जास्त तळलेले पदार्थ आणि जास्त गोड पदार्थ खाऊ नयेत. यामुळे कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढेल, जे खर्च न केल्यास ट्रायग्लिसराइड्स वाढतील.
advertisement
वजन कमी करा : जास्त वजन शरीरासाठी अनेक प्रकारे हानिकारक असले तरी कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स वाढल्यास ते अधिक घातक ठरते. शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा झाल्यानंतर जेव्हा ते योग्यरित्या खर्च केले जात नाही. तेव्हा आधीच जमा झालेल्या कॅलरीज ट्रायग्लिसराइड्स वाढवतात. म्हणून वजन कमी केल्याने ट्रायग्लिसराइड्स देखील कमी होऊ लागतील.
advertisement
advertisement
नियमित व्यायाम : ट्रायग्लिसराइड्स किंवा कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर नियमित व्यायाम करावा. दररोज 30 मिनिटे ते 45 मिनिटे शारीरिक क्रिया ट्रायग्लिसराइड्स किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढेल. जर चांगले कोलेस्टेरॉल वाढले तर वाईट कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होईल.
advertisement
advertisement